साग म्हणजे काय?
साग म्हणजे ‘टीक वुड’ (Teak Wood). याला “लाकडांचा राजा” म्हणून ओळखले जाते. बांधकाम, फर्निचर, सजावटीच्या वस्तूंमध्ये याला मोठी मागणी आहे. सागाचे लाकूड टिकाऊ, मजबूत आणि पाण्याचे मळ न लागणारे असते. त्यामुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही याला प्रचंड मागणी आहे.
साग लागवडीचे फायदे
एकदाची लागवड,दीर्घकाळ फायदा – सागाचे झाड एकदा लावल्यानंतर 15-20 वर्षे नंतर त्यातून लाखोंचा नफा मिळू शकतो.ही एक लाँग टर्म गुंतवणूक आहे.
कमी देखभाल खर्च – सुरुवातीचे 2-3 वर्षे झाडांची निगा राखणे आवश्यक असते. त्यानंतर विशेष देखभालीची गरज नसते.
पाण्याची कमी गरज – सागाच्या शेतीसाठी मध्यम प्रमाणात पाणी लागते, त्यामुळे कोरडवाहू भागांमध्येही ही शेती फायदेशीर ठरू शकते.
हवामान कसं असावे?
हवामान व जमीन : साग शेतीसाठी मध्यम ते काळी जमीन उत्तम मानली जाते. उष्ण व दमट हवामान आवश्यक.
रोपे व रोपांची निवड : सरकारी किंवा प्रमाणित खासगी रोपवाटिकेतून ‘क्लोनल टीक’ किंवा उन्नत जातीची रोपे घ्यावीत.
अंतर ठेवणे : प्रत्येकी झाडामध्ये 10 बाय 10 फूट अंतर ठेवले जाते.
योजना आणि अनुदान : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (RKVY) काही अनुदान मिळू शकते. ‘अग्रोफॉरेस्ट्री’ अंतर्गतही मदत होते.
नफा कसा मिळतो?
प्रति झाड अंदाजे 10-15 घनफुट लाकूड मिळते. सध्या बाजारात 1 घनफुट साग लाकडाची किंमत 1,500 ते 3,000 आहे. एका एकरात साधारण 400 झाडे लावता येतात. आणि त्यातून शेतकरी लाखो रूपये कमवू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 17, 2025 12:12 PM IST