Last Updated:
Agriculture News : अवकाळी पाऊस,अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून दिली जाणारी भरपाई कमी करण्यात आली आहे. यासोबतच, आधी जाहीर केलेली तीन हेक्टरपर्यंतची मदत मर्यादा आता दोन हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.
मुंबई : अवकाळी पाऊस,अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून दिली जाणारी भरपाई कमी करण्यात आली आहे. यासोबतच, आधी जाहीर केलेली तीन हेक्टरपर्यंतची मदत मर्यादा आता दोन हेक्टरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. यासंदर्भात महसूल विभागाने शुक्रवारी नवा शासन निर्णय (जीआर) जाहीर केला आहे.
राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत निकष पूर्वीच निश्चित केले होते, आणि डिसेंबर 2023 पर्यंत त्यानुसारच शेतकऱ्यांना मदत मिळत होती. मात्र, 1 जानेवारी 2024 रोजी महायुती सरकारने एक नवा जीआर काढत मदतीचे दर आणि हेक्टर मर्यादा वाढवली होती.
केंद्राच्या सूचनेनंतर पूर्वीच्या दरांनुसारच मदत
मात्र, केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवले आहे की, नुकसानभरपाई SDRF च्या निकषांनुसारच द्यावी लागेल आणि त्याबाहेर मदत देणे अधिकृत मानले जाणार नाही. त्यामुळे आता 27 मार्च 2023 रोजीच्या जीआरनुसार निश्चित दरांनुसारच मदत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जुने व नवीन दर (तक्त्याच्या स्वरूपात)
नुकसानीचा प्रकार जुने दर (2 हेक्टर मर्यादा) नवीन दर (3 हेक्टर मर्यादा)
जिरायत पिके 8,500 प्रति हेक्टर 13,600 प्रति हेक्टर
बागायत पिके 17,000 प्रति हेक्टर 27,000 प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर 36,000 प्रति हेक्टर
नवा जीआर तत्काळ लागू
शुक्रवारी जाहीर झालेला नवीन जीआर, 1 जानेवारी 2024 रोजीच्या जीआरची जागा घेत असून, तो तत्काळ प्रभावी करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, आता वाढीव दरानुसार मिळणारी नुकसानभरपाई रद्द झाली असून,फक्त पूर्वी ठरवलेल्या दरांनुसारच मदत दिली जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मे 2025 च्या बैठकीत या निर्णयाला अंतिम मंजुरी देण्यात आली होती.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 4:07 PM IST
जिरायतीपासून ते बहुवार्षिक पिकांपर्यंत! नव्याने नुकसान भरपाई किती मिळणार? वाचा सविस्तर