Last Updated:
Farmer ID : राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी Farmer ID (शेतकरी आयडी) अनिवार्य केले गेले आहे.
मुंबई : राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी Farmer ID (शेतकरी आयडी) अनिवार्य केले गेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता हा Farmer ID बनवला असून, Farmer ID शिवाय योजनांचा लाभ घेणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या Farmer ID कार्ड काढण्यात व्यस्त आहेत.
शेतकरी आयडी नोंदणी आणि वापर प्रक्रिया
Farmer ID प्राप्त करण्यास दोन टप्पे असतात जसे की, नोंदणी (Registration) या टप्प्यात शेतकऱ्यांना सेंट्रल आयडीशी एक अपर्यायी Farmer ID मिळते. Farmer ID नंतर त्याला अॅप्रूव्ह करणे आवश्यक असते. नोंदणी झाल्यावरही अनेक शेतकऱ्यांना पूर्ण Farmer ID वापरण्यात अडचणी येत आहेत कारण अद्याप अर्ज मंजूर झालेला नसतो.
काय करावे?
जर तुम्ही Farmer ID मिळवले आणि तरीही योजनांचा लाभ घेत नसाल तर कृपया खालीलप्रमाणे AgriStack संकेतस्थळावर तुमची माहिती तपासा.
सर्वप्रथम AgriStack या वेबसाइटवर जा.‘Farmer’ पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा.
मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून, किंवा OTP प्राप्त करून लॉगिन करा. तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय असल्याची खात्री करा. नाहीतर OTP मध्ये अडचणी येऊ शकतात.
नंतर ‘View My Information’ या पर्यायावर जा: येथे तुमची जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल नंबर, जमिनीची माहिती इत्यादी पूर्ण तपशील दिसेल. जर काही माहिती चुकीची असेल तर ताबडतोब ‘Edit’ किंवा ‘Update’ करून सुधारणा करा.
शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही
Farmer ID हा देशभरातील शेतकऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. जे शेतकरी farmer ID काढणार नाहीत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
Mumbai,Maharashtra
June 08, 2025 8:51 AM IST
फार्मर आयडीसंदर्भात येतेय ही मोठी अडचण! या पद्धतीने लगेच सोडवा अन्यथा होईल नुकसान