योजनेचा उद्देश काय आहे?
शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेततळे खोदण्यासाठी लागणारा खर्च सामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करत वैयक्तिक शेततळ्यांचा समावेश या योजनेत केला आहे.
लाभार्थी पात्रता काय आहे?
अर्जदाराकडे किमान 0.60 हेक्टर जमीन स्वतःच्या नावावर असावी
जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी
अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान घेतले नसावे
लाभार्थी निवड प्रक्रिया कशी होते?
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जातात.
कृषि विभागाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे एकत्रित सोडत होते.
उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात लाभार्थींची निवड होते.
अनुदान किती मिळते?
14,433 रुपये ते 75,000 रुपये पर्यंत अनुदान मिळते. अनुदान शेततळ्याच्या आकार व प्रकारावर अवलंबून असते.आकारमान हे 15x15x3 मीटर ते 34x34x3 मीटर पर्यंत असते. अनुदानापेक्षा अधिक खर्च शेतकऱ्याने स्वतः करणे आवश्यक असतो. 75,000 रुपयांहून अधिक खर्चासाठी शेतकऱ्याने संपूर्ण रक्कम स्वतः द्यायची आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in) वर जाऊन नोंदणी करावी. ‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करावी.आधार प्रमाणीकरण, मोबाईल क्रमांक नोंदणी व वैयक्तिक तपशील भरावेत
आवश्यक कागदपत्रे कोणती?
7/12 आणि 8 अ उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
जातीचा दाखला (असल्यास)
हमीपत्र
Mumbai,Maharashtra
May 31, 2025 11:37 AM IST
पाणी टंचाई मिटवा! सरकार शेत तळ्यासाठी देतंय अनुदान, अर्ज कसा आणि कुठे कराल?