या योजनेसाठी अर्ज कसा कराल?
शेतकरी https://pmfby.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. याठिकाणी नोंदणी, माहिती घेणे, फॉर्म भरणे आणि प्रीमियम भरणे या सर्व प्रक्रिया करता येतात.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम https://pmfby.gov.in या वेबसाइटला भेट द्या.नंतर ‘शेतकरी’ म्हणून नोंदणी करा (मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, बँक तपशील आवश्यक) पुन्हा लॉगिन करा.आपल्या गावातील पिकांची निवड करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. विमा प्रीमियम भरून फॉर्म सबमिट करा. अर्जाची पावती डाउनलोड करा
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड, जमीनधारक कागदपत्रे, 7/12 उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, पेरलेल्या पिकांची माहिती
या योजनेसाठी पात्र कोण?
सर्व लघु, सीमांत व सामान्य शेतकरी
वैध जमीनधारक कागदपत्र असलेले शेतकरी
शेतजमीन भाडेकराराने घेतलेले शेतकरी (विशिष्ट अटींसह)
कृषि कर्ज घेतलेल्यांसाठी विमा घेणे अनिवार्य
या योजनेचे शेतकऱ्यांना फायदे
अत्यंत कमी प्रीमियममध्ये विमा संरक्षण मिळते.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळते.
बँकेचे कर्ज फेडण्यास मदत होते.
मानसिक तणाव व आत्महत्यांमध्ये घट होते.
शेतीसाठी विश्वास आणि स्थैर्य वाढते.
कोणती पीके या योजनेअंतर्गत येतात?
खरीप हंगाम – तांदूळ, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन इ.
रबी हंगाम – गहू, चणा, ज्वारी, हरभरा, मोहरी इ.
व्यावसायिक पीक – कापूस, ऊस, बटाटा, कांदा इ.
राज्यानुसार विमाधारक पिकांची यादी बदलते. याची अधिकृत माहिती PMFBY पोर्टलवर उपलब्ध आहे.
Mumbai,Maharashtra
June 07, 2025 9:36 AM IST