3 महिन्यांत अर्ज अनिवार्य
मालकाचा मृत्यू झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी पूर्वी तलाठी कार्यालयात प्रत्यक्ष जावं लागायचं, मात्र आता ‘ई-हक्क’ पोर्टलवरून ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करता येते.
‘ई-हक्क’ प्रणालीत उपलब्ध सेवा
शेतकरी वारस नोंद, नाव दुरुस्ती, बोजा नोंद, ई-करार अशा 7 ते 8 प्रकारच्या फेरफारांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाच्या स्थितीचा मागोवा देखील या पोर्टलवर घेता येतो. अर्ज मंजूर झाल्यावर 17 व्या दिवशी तो मंडलाधिकाऱ्याकडे पाठवला जातो आणि 18 व्या दिवशी नोंद प्रक्रिया पूर्ण केली जाते.
‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
1) पोर्टलवर नोंदणी
सर्वप्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करा.
‘Proceed to login’ → ‘Create new user’ वर क्लिक करून नवीन यूझर खाते तयार करा.
नाव, मोबाईल, पॅन, पिन कोड, जिल्हा, गाव, ई-मेल, पत्ता इ. माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
2) लॉग-इन करून अर्ज सुरू कसा करायचा?
यूझरनेम व पासवर्ड टाकून लॉग-इन करा.
‘7/12 Mutations’ या पर्यायावर क्लिक करा.
यूझर प्रकार Citizen/Bank निवडा व ‘Process’ वर क्लिक करा.
‘वारस नोंद’ हा फेरफार पर्याय निवडा.
3) अर्ज भरण्याची प्रक्रिया:
अर्जदाराची माहिती भरा.
मृत व्यक्तीचे नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, मृत्यू दिनांक भरून पुढे जा.
‘वारसांची नावे भरा’ या टॅबमध्ये प्रत्येक वारसाची माहिती भरून ‘सेव्ह’ करा.
4) आवश्यक कागदपत्रे आपलोड करा
मृत्यू प्रमाणपत्र, 8-अ उतारा, रेशनकार्ड अशा आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत अपलोड करा.
5. अर्ज सबमिट करा
सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्जावर प्रक्रिया सुरू होते आणि निश्चित कालावधीत नोंद केली जाते.
Mumbai,Maharashtra
तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणं बंद! या पद्धतीने घरबसल्या करा ऑनलाईन वारसा नोंदणी