शेतजमिन अधिक ओलिताखाली आणणे
राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व्हावी आणि सिंचन सुविधा मजबूत व्हाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मनरेगा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या भागांमध्ये मनरेगा कार्यरत आहे, तिथे ही योजना राबवली जाते.
शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड होते. विहीर खोदकाम पूर्ण होणाऱ्या टप्प्यानुसार अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा?
ही योजना विशेषतः सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू आहे. लाभ घेऊ शकणाऱ्या गटांमध्ये खालील शेतकरी समाविष्ट आहेत:
अनुसूचित जाती व जमातीतील शेतकरी
भटक्या व विमुक्त जमाती
गरिबीरेषेखालील (BPL) कुटुंबे
महिला कर्ता असलेली कुटुंबे
दिव्यांग व्यक्ती असलेला कुटुंबप्रमुख
इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
जमीन सुधारणांच्या लाभार्थी
सिमांत (2.5 एकरपर्यंत) आणि अल्पभूधारक (5 एकरपर्यंत) शेतकरी
विहीर खोदण्यासाठी पात्रतेचे निकष काय?
शेतकऱ्यांनी अर्ज करताना खालील अटींचे पालन आवश्यक आहे. जसे की,
अर्जदाराकडे किमान 1 एकर सलग शेती असावी
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटर अंतर अनिवार्य
दोन विहिरींमध्ये 250 मीटरचे अंतर असावे (मागासवर्गीय व BPL साठी हा निकष लागू नाही)
सातबाऱ्यावर आधीपासून विहिरीची नोंद नसावी
अर्जदार मनरेगा जॉब कार्ड धारक असावा
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
पात्र शेतकऱ्यांनी त्यांचा विहीर अनुदानासाठीचा अर्ज स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा.अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
Mumbai,Maharashtra
May 29, 2025 11:37 AM IST
पाणी प्रश्न मिटणार! विहीर खोदण्यासाठी सरकार देतंय 5 लाख रुपये, अर्जप्रक्रिया जाणून घ्या