ड्रॅगन फ्रूट शेती कशी करावी?
ड्रॅगन फ्रूट हे कॅक्टस प्रकारातील फळ आहे आणि उष्ण हवामानात ते चांगले वाढते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांत त्याचे उत्पादन वाढत आहे.
1) हवामान आणि माती
ड्रॅगन फ्रूटसाठी कोरडे आणि उष्ण हवामान योग्य असते.हे पीक हलक्या ते मध्यम प्रकारच्या, चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत चांगले वाढते. मातीचा pH 5.5 ते 7 असावा.
2) लागवड पद्धत
लागवडीसाठी एकरी सुमारे 450-500 खांबांची गरज असते. एका खांबास 2 रोपे लावतात. म्हणजेच एक एकरात 500 ते 800 रोपे लावता येतात. रोपांची लागवड 8 बाय 8 फूट अंतरावर करावी. रोपे सीमेंटच्या खांबांना किंवा लोखंडी पाइपला आधार देऊन वाढवतात.
3) सिंचन आणि खते
ड्रॅगन फ्रूटसाठी फारशा पाण्याची गरज नसते. ठिबक सिंचन प्रणाली सर्वोत्तम असते. जैविक व सेंद्रिय खतांचा वापर करावा. तीन महिन्यांनी खतांचा पुनर्वापर करावा.
4) फळधारणा आणि काढणी
रोपे लावल्यावर साधारण 8-10 महिन्यांनी फळे येण्यास सुरुवात होते. पूर्ण उत्पादनासाठी 1.5 ते 2 वर्षे लागतात. फळे मे ते ऑगस्ट दरम्यान येतात.एका रोपापासून वर्षाला 1 ते 1.5 किलो फळ मिळते.
एकरी खर्च आणि उत्पन्न
प्रारंभीचा खर्च (पहिल्या वर्षी)
खांब, रोपे, ठिबक सिंचन, मजुरी, खत आदींसाठी एकरी सुमारे 3 ते 3.5 लाख खर्च येतो.
एकरी उत्पन्न
तिसऱ्या वर्षांपासून एका झाडाला 8-10 फळे येतात. एका फळाचे सरासरी वजन 200-300 ग्रॅम असते. एक एकरातून दरवर्षी 8 ते 10 टनपर्यंत उत्पादन मिळू शकते. बाजारात प्रतिकिलो दर 100 ते 300 रुपयेपर्यंत मिळतो. म्हणजेच एकरी वार्षिक उत्पन्न 8 ते 15 लाखांपर्यंत जाऊ शकते.
दरम्यान, ड्रॅगन फ्रूट शेती ही उच्च नफा देणारी शेती असून ती दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन व बाजारपेठ लक्षात घेऊन केली तर ही शेती शेतकऱ्यांसाठी लखपती ते करोडपती बनवू शकते.
Mumbai,Maharashtra
May 24, 2025 11:48 AM IST