मातीविना शेती म्हणजे काय?
मातीविना शेती म्हणजे अशी शेती जिथे पारंपरिक मातीऐवजी पिकांना पोषण देण्यासाठी दुसरे माध्यम वापरले जाते. यामध्ये प्रामुख्याने हायड्रोपोनिक्स (पाण्यावर आधारित शेती), कोकोपीट (नारळाच्या शेंड्या व तंतूंमधून तयार केलेले माध्यम) आणि न्युट्रिएंट फिल्म टेक्निक (NFT) वापरले जातात. ही सर्व तंत्रज्ञान पिकाला आवश्यक खते, पाणी आणि पोषणमूल्ये नियंत्रित स्वरूपात पुरवतात.
घराच्या गच्चीवर ही शेती कशी करावी?
1) योग्य ठिकाणाची निवड करा
गच्चीवर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. पिकांना दिवसभरात किमान ४–६ तास तरी नैसर्गिक प्रकाश मिळणे गरजेचे आहे.
2) सेट तयार करा
PVC पाइप्स, ट्रे, बकेट्स किंवा ग्रीनहाऊस यासारख्या गोष्टी वापरून गच्चीवर आवश्यक सेट तयार करता येतो. तसेच पाण्याचे निचरा योग्यरित्या होईल याची खात्री करा. हायड्रोपोनिक्ससाठी पाण्याची टाकी,पंप आणि न्यूट्रिएंट मिश्रणाची व्यवस्था करावी लागते.
3) माध्यमाची निवड
कोकोपीट हे सर्वात सोपे आणि पर्यावरणपूरक माध्यम आहे. मातीऐवजी पिके कोकोपीटमध्ये लावून त्यांना थेट पोषकद्रव्ययुक्त पाणी दिले जाते. हायड्रोपोनिक पद्धतीत पिकांची मुळे थेट न्यूट्रिएंट मिश्रणात बुडवलेली असतात.
काय पिकवता येते?
पालेभाज्या – पालक, मेथी, कोथिंबीर, तुळस,
फळभाज्या – टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी
सलाड भाज्या – कोशिंबीर, लाल कोबी
औषधी वनस्पती – गवती चहा, पुदीना
दरम्यान, घराच्या गच्चीवर मातीविना शेती करणे आता काही कठीण काम राहिलेले नाही. थोडीशी तयारी, योग्य माहिती आणि सातत्य असेल तर कुठल्याही शहरी माणसालाही आपल्या घरात ताजी, सेंद्रिय भाजी मिळवणे शक्य आहे.
Mumbai,Maharashtra
शेतीसाठी जमिनीची गरज नाही! या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकवा पालेभाज्या