मात्र, अनेकदा आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा हक्क मिळवण्यासाठी वारसांना अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः तलाठी कार्यालयातील विलंब किंवा सहकार्याचा अभाव वारस नोंदणीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची करतो. अशा वेळी नागरिकांकडे असलेले कायदेशीर अधिकार जाणून घेणे गरजेचे ठरते.
मृत्यू झाल्यानंतर वारस नोंदणीची कायदेशीर वेळमर्यादा
जर एखाद्या व्यक्तीच्या नावे शेतजमीन किंवा स्थावर मालमत्ता नोंदलेली असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांनी तीन महिन्यांच्या आत वारस नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक असते. ही नोंदणी न केल्यास जमिनीच्या व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.
कोण अर्ज करू शकतो?
मृत व्यक्तीचे विधवा पत्नी / विधुर पती
मृताचे मुले-मुली
मृत व्यक्तीची आई
हे सर्वजण त्या व्यक्तीच्या वारसत्वासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा अधिकृत वारसत्व सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
तलाठी कार्यालयात वारस नोंदणी प्रक्रिया कशी करावी?
तलाठी हे जमिनीच्या नोंदी ठेवणारे अधिकृत अधिकारी आहेत.वारस हक्काची नोंदणी करण्यासाठी संबंधित नागरिकाने तलाठी कार्यालयात योग्य अर्ज सादर करावा लागतो.तलाठ्याने ते तपासून संबंधित नोंदींमध्ये आवश्यक बदल करणे अपेक्षित असते.
वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
भरलेला अर्ज / फॉर्म (वैध माहिती असलेला)
पत्त्याचा पुरावा (आधार, वीजबिल इत्यादी)
रेशन कार्ड
वारसांचे प्रतिज्ञापत्र
मृत्यू प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो
न्यायालयाचा शिक्का असलेले कागद
मृत व्यक्ती शासकीय सेवेत असल्यास संबंधित सेवा नोंदी व अधिकाऱ्याचे पत्र
आधार कार्ड
वारस हक्क आणि कायदेशीर पर्याय
तलाठ्याने जर वारस नोंदणी करण्यास नकार दिला, तर संबंधित व्यक्ती तहसील कार्यालय किंवा न्यायालयात अर्ज करू शकतो. वारस नोंदणी ही कोणतीही कृपा नसून, कायदेशीर हक्क आहे.
दरम्यान, शेतजमिनीचा सातबारा उतारा म्हणजे केवळ मालकी नव्हे तर अनेक सरकारी योजनांमध्ये सहभागासाठी असणारे मुख्य दस्तावेज आहे. मृत व्यक्तीच्या नंतर वारसांनी वेळेत योग्य कागदपत्रांसह अर्ज करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये अडथळे आल्यास कायदेशीर हक्कांचा उपयोग करून, योग्य अधिकारी आणि पद्धतीचा आधार घ्यावा.
Mumbai,Maharashtra
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर सातबारा उताऱ्यावर नाव कसं लावायचे? वाचा संपूर्ण प्रक्रिया