योग्य जागेची निवड
या प्रकल्पासाठी फार मोठ्या जागेची गरज नसते. सुमारे 10×20 फूट इतक्या मोकळ्या जागेत सुरुवात करता येते. जागा सावलीत आणि चांगल्या जलनिकासी असलेली असावी. जमिनीवर विटांनी तीन बेड तयार करून त्यात गांडूळ उत्पादन सुरू करता येते. काहीजण प्लास्टिक ड्रम, सिमेंट टाक्या यांचा वापरही करतात.
आवश्यक साहित्य व खर्च
गांडूळ खत तयार करण्यासाठी गाई-म्हशीचे शेण, सडलेली फळे-भाज्या, पालापाचोळा, गवत, थोडेसे ओले किचन वेस्ट असे नैसर्गिक घटक वापरले जातात. याशिवाय, Eisenia fetida जातीचे गांडूळ (Red Wigglers) 10-15 किलो घेतले जाते. हे गांडूळ बाजारात ₹३००-₹५०० प्रति किलो दराने उपलब्ध असते.
खर्चाचे घटक अंदाजित खर्च
शेड व बेड तयार करणे 15,000 रु
गांडूळ खरेदी 4,000 रु
कच्चा माल (शेण, वेस्ट) 5,000 रु
पाणी व सिंचन व्यवस्था 2,000 रु
पॅकिंग/विपणन खर्च 5,000 रु
अनपेक्षित खर्च 4,000 रु
एकूण खर्च 50,000 रु
उत्पादन आणि नफा
एका बॅचमध्ये (60-75 दिवसांत) सुमारे 1 टन गांडूळ खत तयार होते. स्थानिक बाजारपेठ, शेती निवास केंद्रे, नर्सरी यांना ते 5 रु ते 10 रु प्रति किलो दराने विकता येते. यामुळे एका चक्रात 5,000 ते 10,000 पर्यंत उत्पन्न मिळू शकते. वर्षभरात चार ते पाच बॅचेस घेतल्यास वार्षिक उत्पन्न 40,000 ते 60,000 पर्यंत जाऊ शकते. प्रकल्पाचा विस्तार केल्यास उत्पन्न अधिक वाढू शकते.
प्रशिक्षण आणि परवानग्या
कृषी विज्ञान केंद्रे (KVK), आत्मा योजना, किंवा ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्याकडून मोफत प्रशिक्षण मिळू शकते. प्रकल्प मोठा करताना MSME नोंदणी, FCO परवाना आणि NABARD अनुदान यासाठी प्रयत्न करता येतो.
दरम्यान, अवघ्या 50,000 रु गुंतवणुकीत गांडूळ खत प्रकल्प उभारून रोजगार व पर्यावरणपूरक शेतीला चालना देता येते. खासकरून ग्रामीण भागातील युवक व शेतकरी यांच्यासाठी हा एक चांगला, टिकाऊ आणि उत्पन्नदायी व्यवसाय ठरू शकतो.
Mumbai,Maharashtra
May 07, 2025 11:30 AM IST
50 हजार रु भांडवलात लाखोंची कमाई! नोकरीलाही ठोकाल रामराम असा व्यवसाय, वाचा सविस्तर