‘संशोधन शेतकऱ्यांच्या दारी’, थेट शेतात मार्गदर्शन
या अभियानाची संकल्पना ‘संशोधन शेतकऱ्यांच्या दारी’ अशी असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी आणि प्रयोगशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सुधारित लागवड तंत्रज्ञान,अन्नद्रव्य व्यवस्थापन,कीड व रोग नियंत्रण
कृषी योजनांची माहिती यासारख्या बाबींचा समावेश असेल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील 180 गावांमध्ये रथयात्रा
हे अभियान देशभर राबवले जाणार असले तरी, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील निवडक 180 गावांमध्ये विशेष रथ पोहोचणार आहे. या उपक्रमासाठी दोन विशेष शास्त्रज्ञांची टीम तयार करण्यात आली असून, त्या प्रत्येक गावात पोहोचून माहिती व मार्गदर्शन देतील.
संशोधन संस्था आणि कृषी विभागांचा एकत्रित सहभाग
या अभियानात भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कार्यरत द्राक्ष संशोधन केंद्र
पुष्प संशोधन केंद्र, कांदा व लसूण संशोधन केंद्र, पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, यांच्यासह आत्मा योजना व कृषी विभागाचे अधिकारी एकत्र येणार आहेत. अभियानादरम्यान प्रगतिशील,उद्यमशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
शेतकरी गट, बचत गट व उत्पादक कंपन्यांचा सहभाग
या अभियानामध्ये शेतकरी गट, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या सक्रियपणे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी, गरजा व नवकल्पनांवर चर्चा होईल. या ठिकाणी छोट्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
Mumbai,Maharashtra