विशेष म्हणजे, चंदन हे भारतात सर्वाधिक महागडं लाकूड मानलं जातं. सध्या बाजारात चंदनाच्या लाकडाचा दर प्रती किलो 26 हजार ते 30 हजार रुपये आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो लाकूड मिळू शकतं, म्हणजेच एकाच झाडापासून 5 ते 6 लाख रुपयांचा नफा सहज मिळू शकतो.
चंदन लागवडीसाठी आवश्यक माहिती
पर्यायी पीक म्हणून शक्य: तुम्ही संपूर्ण शेतात चंदन लावू शकता किंवा फक्त बांधावरही लागवड करता येते. यामुळे इतर पिकांसोबतही ही शेती शक्य आहे.
पाण्याची गरज कमी: चंदनाच्या झाडांना जास्त पाण्याची गरज नसते, त्यामुळे कमी सिंचनाच्या भागांमध्येही ही शेती यशस्वी होऊ शकते.
होस्ट प्लांटची गरज: चंदन हे परजीवी झाड असल्यामुळे त्याच्यासोबत होस्ट प्लांट लावणं अत्यावश्यक आहे.
स्वच्छतेची गरज: झाडांच्या आजूबाजूला स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे असते.
लागवडीसाठी योग्य वेळ आणि रोपांची माहिती
कधीही करता येते लागवड: चंदन लागवडसाठी कोणताही विशिष्ट हंगाम नसतो, पण रोपे २ ते अडीच वर्षांची असावीत.
रोपांची किंमत: एक चंदनाचं रोप 100 ते 130 रुपये, आणि होस्ट प्लांट 50 ते 60 रुपये यामध्ये मिळतात.
सुरक्षा आणि विक्री
चंदन लावल्यानंतर पहिल्या ८ वर्षांत त्याला विशेष सुरक्षा द्यावी लागत नाही. पण त्यानंतर झाड सुगंधी होऊ लागते आणि त्याची बाजारात मोठी मागणी निर्माण होते. याच कारणामुळे सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे ठरते. सध्या सरकारने चंदनाच्या खाजगी खरेदी-विक्रीवर बंदी घातली असून, केवळ सरकारच चंदन खरेदी करते. त्यामुळे शेती करताना योग्य नोंदणी व अधिकृत प्रक्रियांचे पालन करणं गरजेचं आहे.
कुठे होतो चंदनाचा वापर?
परफ्यूम आणि सौंदर्यप्रसाधन उद्योगात मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि धार्मिक व संस्कृतिक विधींमध्ये वापर केला जाणार
(टीप: चंदन शेती सुरू करण्यापूर्वी स्थानिक वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.)
Mumbai,Maharashtra
May 06, 2025 11:40 AM IST
करोडपती करणारी शेती! एक झाडाची किंमत 6 लाख रुपये, लागवडप्रक्रिया जाणून घ्या