By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: घराच्या बाल्कनीत पिकवा लालेलाल टरबूज, लागवडीपासून ते काढणीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > घराच्या बाल्कनीत पिकवा लालेलाल टरबूज, लागवडीपासून ते काढणीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
टॉप स्टोरीज़

घराच्या बाल्कनीत पिकवा लालेलाल टरबूज, लागवडीपासून ते काढणीपर्यंत जाणून घ्या सविस्तर

News Desk
Last updated: 2025/05/02 at 11:28 PM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:April 28, 2025 10:51 AM IST

Agriculture News : टरबूज तुमच्या स्वतःच्या घराच्या बाल्कनीत सहज उगवलं तर? होय, थोड्या मेहनतीने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्हीही तुमच्या छोट्याशा जागेत टरबूजाचे गोडसर फळ मिळवू शकता. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

News18

मुंबई : उन्हाळ्यात थंडगार, रसाळ टरबूज कोणाला आवडत नाही? चटक उन्हात एखादं गार टरबूज खाल्लं, की क्षणार्धात थंडावा जाणवतो. टरबूजामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आणि त्याचा शीतल प्रभाव असल्याने, उन्हाळ्यात ते बहुतेक लोकांचं आवडतं फळ ठरतं.जर हे टरबूज तुमच्या स्वतःच्या घराच्या बाल्कनीत सहज उगवलं तर? होय, थोड्या मेहनतीने आणि योग्य मार्गदर्शनाने तुम्हीही तुमच्या छोट्याशा जागेत टरबूजाचे गोडसर फळ मिळवू शकता. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

माती आणि सूर्यप्रकाशाचे महत्त्व

टरबूज वाढवण्यासाठी चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध माती आवश्यक आहे. बियाणे पेरण्याआधी मातीमध्ये जुने कंपोस्ट किंवा शेणखत मिसळा, जेणेकरून मातीत पोषणमूल्ये वाढतील आणि निचरा सुधारेल. पीएच स्तर 6.0 ते 7.0 दरम्यान असणे गरजेचे आहे. टरबूजाच्या योग्य वाढीसाठी दररोज आठ ते दहा तास भरपूर सूर्यप्रकाश मिळणं अत्यावश्यक आहे.

लागवडीची वेळ

शेवटच्या थंडीच्या दिवसांनंतर सहा ते आठ आठवडे आधीच बियाण्यांची पेरणी करा. भांडे थेट सूर्यप्रकाशात ठेवा आणि माती कायम थोडीशी ओलसर ठेवा. मात्र, पाण्याचा अतिरेक टाळा. झाडाच्या फुलोऱ्याच्या काळात विशेष काळजी घ्या. दर आठवड्याला साधारण एक ते दोन इंच पाणी देऊन माती ओलसर ठेवा.

पाणी देण्याची योग्य पद्धत

झाडाच्या मुळाजवळ खोलवर पाणी देणे अधिक प्रभावी ठरते. यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि पानांवर आर्द्रता राहून बुरशीजन्य रोग पसरण्याचा धोका टाळता येतो.टरबूजाच्या झाडांवर नर आणि मादी अशा दोन्ही प्रकारची फुले येतात. नर फुले परागकण निर्माण करतात, तर मादी फुलांच्या तळाशी असलेली सूज परागणानंतर फळात रूपांतरित होते. योग्य परागीकरण झाल्याशिवाय फळनिर्मिती होत नाही.

कीटक आणि रोगांपासून संरक्षण

टरबूजाच्या झाडांना ऍफिड्स, स्क्वॅश बग्स आणि काकडी बीटल्ससारख्या कीटकांचा धोका असतो. या कीटकांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी भाजीपाल्याच्या रांगा झाकून ठेवा. रोप फुलल्यानंतर आवरण हटवा, जेणेकरून परागीकरण व्यवस्थित होईल. पीक फेरपालट केल्यानेही कीटकांचा प्रसार कमी करता येतो. तसेच, कडुलिंब तेल किंवा सेंद्रिय कीटकनाशक साबण यांचा वापर करूनही झाडांचे संरक्षण करता येते.बुरशीजन्य रोगांच्या लक्षणांची नियमितपणे तपासणी करा आणि रोगट पाने तात्काळ काढून टाका.

फळ पिकले हे कसे ओळखावे?

टरबूज तयार होण्यासाठी साधारणतः 60 ते 90 दिवस लागतात. फळाखाली जर पिवळसर डाग दिसत असेल, तर समजावे की टरबूज पिकले आहे. तसेच, टरबूज वाजवताना जर खोखो आवाज येत असेल, तर ते पाण्याने भरलेले आणि रसाळ झालेले असते. फळाजवळील देठ जर कोरडा आणि तपकिरी दिसत असेल, तर ते आणखी एक स्पष्ट लक्षण आहे की टरबूज तोडायची योग्य वेळ आली आहे.

Location :

Mumbai,Maharashtra

First Published :

April 28, 2025 10:51 AM IST

मराठी बातम्या/कृषी/

उन्हाळ्यात घराच्या बाल्कनीत पिकवा लालेलाल टरबूज, लागवडीपासून ते काढणीपर्यंत जाणून घ्या सविस्तर

TAGGED: agriculture news, balcony farming, farmer, home gardening, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः भूषण पॉवरचा समाधान योजना रद्द, जेएसडब्ल्यू स्टील शॉक – सर्वोच्च न्यायालयांचा प्रमुख निर्णय भूषण पॉवर सॉल्व्ह स्कीमने जेएसडब्ल्यू स्टील रद्द केले
Next Article रिलायन्स उद्योगांना एसएटीने एक धक्का दिला! फेसबुक -जिओ डीलसाठी दंड, सेबी ऑर्डर लागू होईल – रिलायन्स इंडस्ट्रीज एसएटी अ‍ॅपिया
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

Agriculture News : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
‘मॅरियट बाय मालिका’ च्या प्रक्षेपणानंतर, आम्ही भारतीय cities ० शहरांपर्यंत पोहोचू, हॉस्पिटॅलिटीचे चित्र बदलू: मेनन – मॅरियट मिडस्केल सेगमेंटमध्ये प्रवेश करते आणि मालिकेच्या ब्रँडने भारतीय हॉस्पिटॅलिटीमध्ये नवीन अध्याय चिन्हांकित केले आहे.
Business May 25, 2025
Agriculture News : करोडपती होण्याची संधी! 1 एकरात 600 झाडी लावा, 30 कोटी रु पर्यंत उत्पन्न मिळवा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025
Agriculture News : पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा
टॉप स्टोरीज़ May 25, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?