Last Updated:
Agriculture News : जर तुमच्याकडे गावी शेतजमीन असेल, तर ती फक्त पडून न ठेवता कमाईचं साधन बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक शेती केल्यास घरबसल्या तुम्ही स्थिर आणि मोठं उत्पन्न मिळवू शकता.
मुंबई : जर तुमच्याकडे गावी शेतजमीन असेल, तर ती फक्त पडून न ठेवता कमाईचं साधन बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक शेती केल्यास घरबसल्या तुम्ही स्थिर आणि मोठं उत्पन्न मिळवू शकता. येथे आम्ही अशा तीन फायदेशीर शेती प्रकल्पांबाबत माहिती देत आहोत. जे आजच्या बाजारपेठेतील मागणीनुसार अत्यंत नफा देणारे ठरू शकतात.
लिंबू शेती
लिंबू शेती ही कमी मेहनतीमध्ये येते तसेच ती दीर्घकालीन उत्पन्न देणारी शेती आहे. झाड लावताना सुमारे 1 फूट खोल खड्डा करावा आणि त्यात पाणी भरून काही वेळ तसेच ठेवावे. खड्डा वाळल्यानंतर त्यात माती भरून रोप लावावे आणि भोवती गोल आकारात चर करावा. नंतर गरजेनुसार नियमित पाणी देत राहावे. 3 ते 3.5 वर्षांनंतर झाडाला फळे येऊ लागतात. एकदा लावलेले लिंबाचे झाड 30 वर्षांपर्यंत फळ देत राहते. बाजारात लिंबाला वर्षभर मागणी असल्याने विक्रीची चिंता राहत नाही.
मधमाशी पालन
मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा, तसेच सातत्याने वाढणारा व्यवसाय आहे. फक्त 10 पेट्यांपासून सुरुवात करता येते. सुरुवातीचा खर्च सुमारे 30,000 ते 40,000 रु असतो. दरवर्षी मधमाश्यांची संख्या वाढते आणि त्यासोबतच मधाचे उत्पादन आणि तुमचा नफाही वाढतो. सध्या बाजारात शुद्ध मधाची किंमत 700 ते 1000 प्रति किलो दरम्यान आहे.
शुद्ध मधाला शहरांमध्ये आणि ऑनलाइन मार्केटमध्येही मोठी मागणी आहे.
ब्लूबेरी शेती
ब्लूबेरी ही विदेशी फळपीक असून भारतात तिची सतत वाढती मागणी आहे. मात्र, अजूनही फारच कमी शेतकरी याची लागवड करतात, त्यामुळे किंमती उच्च आणि स्पर्धा कमी आहे. एकदा लागवड केल्यास ही झाडे 10 वर्षांपर्यंत फळ देतात. ब्लूबेरी उच्च दर्जाच्या बाजारात विकली जाते. त्यामुळे प्रत्येक हंगामात लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो. निर्यातक्षम असल्याने विदेशी बाजारांमधूनही मागणी येऊ शकते.ब्लूबेरी लागवड करण्यासाठी जमिनीचा योग्य निचरा, मध्यम हवामान आणि नियोजित व्यवस्थापन गरजेचे असते.
दरम्यान, गावाकडील जमीन ही फक्त मालकी न ठरता संपत्ती आणि उत्पन्नाचं स्रोत बनवता येते. लिंबू शेती, ब्लूबेरी शेती या तीनही प्रकल्पांतून कमी खर्च, कमी मेहनत आणि मोठा नफा मिळू शकतो.
Mumbai,Maharashtra