Last Updated:
Agriculture News : ग्रामीण भागातील शेती आणि गावकुस परिसरात ‘शिवरस्ता’ हा शब्द नेहमीच ऐकायला मिळतो. शेतात जाण्यासाठी वापरला जाणारा, गावठाणाच्या बाहेर असलेला आणि सार्वजनिक उपयोगासाठी ठेवलेला मार्ग म्हणजे शिवरस्ता.
मुंबई : ग्रामीण भागातील शेती आणि गावकुस परिसरात ‘शिवरस्ता’ हा शब्द नेहमीच ऐकायला मिळतो. शेतात जाण्यासाठी वापरला जाणारा, गावठाणाच्या बाहेर असलेला आणि सार्वजनिक उपयोगासाठी ठेवलेला मार्ग म्हणजे शिवरस्ता. पण अनेकदा या रस्त्यावर खाजगी हक्क सांगण्याचे, अतिक्रमण करण्याचे प्रकार घडतात.त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो शिवरस्त्यावर खाजगी मालकी शक्य आहे का? याचेच उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
शिवरस्ता म्हणजे काय?
शिवरस्ता हा कुठल्याही गावाच्या गावसारातून किंवा महसूल नकाशावरून दिसणारा सार्वजनिक रस्ता असतो. याचा वापर प्रामुख्याने शेतात जाण्यासाठी, पाण्याच्या स्रोतांपर्यंत पोहोचण्यासाठी, जनावरांना नेण्यासाठी किंवा ग्रामीण भागातील एकमेकांशी जोडणाऱ्या मार्गासाठी केला जातो.
तो गावच्या सार्वजनिक मालमत्तेचा भाग असतो आणि याचा वापर सर्व ग्रामस्थांना खुला असतो.
शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवता येतो का?
तर याचं उत्तर नाही असं आहे. शिवरस्त्यावर कोणतीही वैयक्तिक मालकी मिळवता येत नाही.
भारतीय कायद्यांनुसार, शिवरस्ते हे सार्वजनिक मालमत्ता (Public Utility Land) म्हणून वर्गीकृत असतात. हे रस्ते महसूल विभागाच्या नोंदीत “गाव मार्ग” किंवा “गावसारातील सार्वजनिक रस्ता” म्हणून नोंदवलेले असतात. जर एखाद्या व्यक्तीने या रस्त्यावर अतिक्रमण केले असेल म्हणजे तटबंदी, बांधकाम, शेतजमिनीत जोडणी इत्यादी. तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो.
कायदेशीर तरतुदी काय सांगतात?
महसूल कायदा आणि गावनकाशानुसार, शिवरस्ते गावासाठी राखीव असतात. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था शिवरस्त्यावर मालकी हक्क सांगू शकत नाही. 1966 च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम 48(7) आणि मौजेच्या फेरफार नकाशानुसार, सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. तसेच तहसीलदार किंवा मंडल अधिकारी अतिक्रमण हटवण्याचे आदेश देऊ शकतात.
शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्यास काय करावे?
स्थानिक ग्रामसेवक, तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना लेखी तक्रार द्यावी. गावनकाशा किंवा सातबारा उतारा तपासावा, ज्यात रस्त्याचे अस्तित्व स्पष्ट दिसते. RTI अंतर्गत माहिती मागवून रस्त्याची अधिकृत स्थिती तपासता येतशेवटी, न्यायालयात स्थावर मालमत्तेच्या अतिक्रमणाविरोधात दावा दाखल करता येतो.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 2:12 PM IST