Last Updated:
प्रगतिशील शेतकरी धनंजय दास यांनी पिवळ्या कलिंगडची यशस्वी लागवड करून स्थानिकांना आश्चर्यचकित केले आहे. 15 वर्षांपासून शेतीत…
आत्तापर्यंत आपल्याला बाहेर हिरवंगार आणि आतून लाल असलेलं कलिंगड माहीत होतं. पण आसामच्या कच्छरमधील धनंजय दास या प्रगतशील शेतकऱ्याने कमालच केली आहे. त्यांनी पिवळ्या रंगाचा कलिंगड यशस्वीरित्या पिकवलं आहे! चेचारी गावपंचायतीमधील पुरंदरपूर गावाचे रहिवासी असलेले धनंजय, गेल्या 15 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांनी आपल्या या यशाने स्थानिक लोकांना चकित केले आहे. ते फक्त भात, दलिया, भाजीपाला इतकंच नाही, तर कांदा, सुधारित जातीची लाल कोबी, सोयाबीन, आंबा, फणस यांसारखी फळे आणि भाज्याही पिकवतात.
दिल्लीतून आणले बियाणे
गेल्या तीन वर्षांपासून ते आपल्या शेतात कलिंगड पिकवत आहेत. पण यावर्षी त्यांनी दिल्लीतून पिवळ्या कलिंगडाचे बियाणे विकत आणले. बरखाला फार्मा प्रोड्यूसर्स ऑर्गनायझेशनचे सीईओ असलेल्या धनंजय यांनी सांगितले की, बराक खोऱ्यात अशा रंगाच्या कलिंगडची शेती पहिल्यांदाच झाली आहे. यावर्षी त्यांनी प्रायोगिक तत्वावर हे पीक घेतले. सध्या हे कलिंगड 20 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.
12 क्विंटल उत्पादन, आता ‘रंगीबेरंगी’ कलिंगड येणार
यावर्षी त्यांना 12 क्विंटल पिवळ्या कलिंगडाचे उत्पादन मिळाले. भविष्यात त्यांची निळा, नारंगी आणि काळा अशा आणखी तीन रंगांचे कलिंगड पिकवण्याची योजना आहे. विशेष म्हणजे, धनंजय यांनी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता, पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने हे कलिंगड पिकवले आहेत. धनंजय सांगतात की, त्यांच्या पद्धतीचा अवलंब केल्यास त्यांना प्रति बिघा 5 टनांपेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते.
या भागातील शेतकरी सहसा एक पीक घेतल्यानंतर दुसरे कोणतेही पीक, फळे किंवा भाज्या पिकवत नाहीत किंवा त्यात त्यांना रस नसतो. धनंजय यांना ही विचारसरणी बदलायची आहे. बटाटे आणि शेंगा पिकवल्यानंतर त्याच जमिनीत हे कलिंगड खूप चांगल्या प्रकारे पिकवता येतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाचे सहकार्य लाभले
धनंजय यांनी सांगितले की, त्यांना कच्छर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आणि अपार्ट प्रोजेक्टकडून नेहमीच मदत मिळाली आहे. शेतीबद्दल मिळालेल्या सल्ल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्याकडे 4 बिघांपेक्षा जास्त शेती आहे आणि या जमिनीत ते भात, भाजीपाला, मका, फळे इत्यादी पिके घेतात.
Mumbai,Maharashtra
या शेतकऱ्याने केली कमाल! शेतात पिकवला ‘पिवळा’ कलिंगड, तोही सेंद्रिय पद्धत्तीने, बाजारात मिळतोय इतका भाव