पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात नवं काहीतरी घडतंय. पारंपरिक ऊस शेतीला पर्याय म्हणून आधुनिक फळशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कमी वेळेत, कमी खर्चात आणि जास्त नफा देणाऱ्या पिकांचा शोध घेताना कोल्हापूर तालुक्यातील कांडगाव येथील जयसिंग पाटील आणि प्रताप पाटील या सख्ख्या भावांनी ड्रॅगन फळाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तैवान, व्हिएतनाम, थायलंडसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आता कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या पट्ट्यात जोमाने वाढत आहे. पाटील बंधूंनी 3 एकर क्षेत्रावर ही शेती फुलवली असून, त्यांना यातून भरघोस नफा मिळत आहे.
ऊस शेतीला शोधला पर्याय, कोल्हापूरच्या पाटील बंधूंनी केली ड्रॅगन शेती, लाखोंचा नफा

Leave a comment
Leave a comment