मालमत्ता खरेदी-विक्री करताना कोणती कागदपत्रे आवश्यक?
घर, फ्लॅट किंवा जमीन विक्री करताना खालील कागदपत्रे अत्यावश्यक मानली जातात जसे कि,
नोंदणीकृत विक्री करार (Sale Deed)
लीज डीड (भाडेपट्टा)
गिफ्ट डीड (दानपत्र)
विनिमय करार (Exchange Deed)
मॉर्गेज कागदपत्र (हक कर्ज व्यवहार असल्यास)
इमारतीचे आराखडे
बिल्डरकडून मिळालेली वाटपपत्रे
मालकीचे पूर्वीचे नोंदणीकृत कागदपत्रे
पॉवर ऑफ अटर्नी (लागू असल्यास)
युटिलिटी बिले आणि मालमत्ता कराची स्लिप
विक्री करार म्हणजे काय?
विक्री करार (Sale Deed) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो मालक किंवा विक्रेत्याला मालमत्तेचे संपूर्ण हक्क खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित करण्याचा अधिकार देतो. हा करार स्थानिक उपनिबंधक कार्यालयात नोंदवणं बंधनकारक असतं. याच्या आधारेच मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी केली जाते आणि व्यवहार कायदेशीर रूपात पूर्ण होतो.
नोंदणीकृत कराराशिवाय व्यवहार अपूर्ण
मालमत्ता कायदा, 1882 च्या कलम 54 नुसार, 100 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची कोणतीही स्थावर मालमत्ता फक्त नोंदणीकृत दस्तऐवजाच्या आधारेच वैधपणे हस्तांतरित केली जाऊ शकते. अन्यथा त्या व्यवहाराला कायदेशीर मान्यता दिली जाणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय?
मालमत्तेशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ठाम भूमिका घेतली आहे की, नोंदणीकृत विक्री कराराशिवाय मालकी हस्तांतरण वैध मानले जाणार नाही. केवळ ताबा देणे किंवा पैसे देवाणघेवाण करून मालकी बदलता येत नाही. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि एस. एस. नागरत्न यांच्या खंडपीठाने या निकालात स्पष्ट सांगितले की, मालमत्ता हस्तांतरण कायद्यानुसार मालकी फक्त कायदेशीर, नोंदणीकृत दस्तऐवजावर आधारित असावी लागते.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 1:01 PM IST