हिंदू उत्तराधिकार कायदा काय सांगतो?
हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 हा भारतातील हिंदूंना लागू होणारा प्रमुख कायदा असून, मृत्यूनंतर मालमत्तेचा वाटप कोणत्या आधारावर होईल, याचे स्पष्ट मार्गदर्शन करतो. यामध्ये हिंदू पुरुष किंवा स्त्रीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा हक्क कोणाला असेल? हे सांगितले गेले आहे.
2005 नंतर मुलींनाही मिळाला समान हक्क
2005 मध्ये या कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, मुलींनाही मुलांप्रमाणेच वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क मिळाला आहे. याआधी केवळ मुलालाच प्रमुख वारस मानले जात होते.
वारसांची श्रेणी
हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, पहिल्या श्रेणीतील वारसांमध्ये खालील सदस्यांचा समावेश होतो.
मुलगा,मुलगी,पत्नी,आई या सर्वांमध्ये संपत्ती समान वाट्याने विभागली जाते.
नोंदणीकृत दस्तऐवजच वैध
या कायद्यानुसार, 100 रु पेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता (उदा. जमीन, घर) केवळ नोंदणीकृत दस्तावेजाद्वारेच हस्तांतरित केली जाऊ शकते. नोंदणीशिवाय झालेला व्यवहार कायदेशीर मान्यता मिळवत नाही.
संपत्तीतून बेदखल करणे, कोणते हक्क?
जर पालकांनी आपल्या मुलगा किंवा मुलीला मालमत्तेतून बेदखल करण्याचा निर्णय घेतला, तर
स्वतःच्या कमाईच्या मालमत्तेतूनच ते त्यांना बेदखल करू शकतात.वडिलोपार्जित मालमत्तेतून कोणालाही बेदखल करता येत नाही. म्हणजेच, वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलगा आणि मुलीचा हक्क कायम असतो,जरी त्यांना कुटुंबातून बेदखल करण्यात आले तरीही.
वाद टाळण्यासाठी काय करावे?
संपत्तीची योग्य वेळेत नोंदणी करा.
वारस हक्काबाबत स्पष्ट दस्तऐवज ठेवा.
कायद्याचे ज्ञान घ्या व आवश्यक तेव्हा वकीलांचा सल्ला घ्या.
Mumbai,Maharashtra
June 02, 2025 4:41 PM IST
भांडण न करता वडीलोपार्जित जमीन, मालमत्तेवर हक्क कसा मिळवायचा? वाचा सविस्तर