मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत माहिती दिली की, राज्यातील शासकीय सेवा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून, महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रात 10 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एका ऐवजी दोन सेवा केंद्रे, तसेच 5 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये एका ऐवजी दोन सेवा केंद्रे आणि 5 हजारांवर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी दोनऐवजी चार सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
महाग झाल्या सरकारी सेवा
राज्य शासनाने विविध प्रमाणपत्रे, दाखले, प्रतिज्ञापत्रे यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठा वाढ केली आहे. आता या सेवा घेताना नागरिकांना स्टॅम्प शुल्क, जीएसटी, सेतू सेवा शुल्क, महा-आयटी व सेवा केंद्र चालक शुल्क मिळून जास्त रक्कम भरावी लागणार आहे.
शुल्कवाढीनंतरचे नवीन दर खालीलप्रमाणे
सेवा प्रकार जुना दर (₹) नवीन दर (₹)
जातीचा दाखला 58 128
नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र 58 128
अधिवास प्रमाणपत्र 34 69
उत्पन्नाचा दाखला 34 69
प्रतिज्ञापत्र 34 69
महिला आरक्षण प्रमाणपत्र 34 69
शेतकरी प्रमाणपत्र 34 69
भूमिहीन प्रमाणपत्र 34 69
श्रावणबाळ योजना अर्ज 34 69
Mumbai,Maharashtra
May 11, 2025 12:22 PM IST
शासकीय दाखले काढणं महागणार! सरकारकडून नवीन दर लागू, कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क?