Last Updated:
PM Kisan 20th Installment : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
मुंबई : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार 20 जून 2025 रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो. मात्र, केंद्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरवर्षी 6,000 रुपये थेट खात्यावर
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. आजवर देशातील लाखो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
मागील हप्ता बिहारमध्ये जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील दौऱ्यात 19 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर शेतकरी 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
अन्यथा लाभ मिळणार नाही
PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई-केवायसी (eKYC) पूर्ण असणे. OTP आधारित eKYC आता बंधनकारक करण्यात आली आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल, तर लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून लवकरात लवकर eKYC प्रक्रिया पूर्ण करावी.
‘PM kisan’यादीत नाव ऑनलाईन कसं चेक कराल?
PM-KISAN योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव यांची माहिती निवडा. ‘Get Report’ वर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुमचं नाव आहे का हे तपासा. तसेच जर तुमचं नाव यादीत नसेल किंवा हप्ता मिळाला नसेल तर संबंधित CSC केंद्राशी संपर्क साधा.
Mumbai,Maharashtra
June 19, 2025 8:36 AM IST