Last Updated:
Agriculture News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून 2025 या कालावधीसाठीचा 20 वा हप्ता येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून 2025 या कालावधीसाठीचा 20 वा हप्ता येत्या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसी व बँक खात्यांचे आधार सिडिंग पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
20 व्या हप्त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 मे 2025 पर्यंत सर्व आवश्यक प्रक्रियांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.त्यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी कोणत्या अटी पूर्ण कराव्या?
ई-केवायसी (e-KYC)
मोबाईल अॅपद्वारे चेहरा किंवा अंगठा स्कॅन करून करता येईल. महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी सहाय्यकांकडे जाऊन सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
नवीन नोंदणी (Self Registration)
PM-KISAN Portal वर फेरफार माहिती अपलोड करावी. अथवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करावी.
बँक खाते व आधार सिडिंग
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडणे आवश्यक. जवळच्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये DBT खाते उघडावे.
फार्मर आयडीही आवश्यक
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत फार्मर आयडी अनिवार्य केला आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर तयार करून घ्यावा. अन्यथा दोन्ही योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार नाही.
दरम्यान, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळवण्यासाठी, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, 31 मे 2025 पर्यंत सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा योजनेपासून लाभ वंचित राहण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra