शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतात 6,000 रुपये
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये, दर चार महिन्यांनी 2,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. हे पैसे शेतकरी बियाणे, खते आणि शेतीशी संबंधित गरजा भागवण्यासाठी वापरतात.
20 वा हप्ता कधी मिळेल?
योजनेतील 20 वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी अनिवार्य, अन्यथा लाभ थांबेल
योजनेचा पुढील हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ई-केवायसी करण्याचे 3 मार्ग आहेत.
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून स्वयं ई-केवायसी करा.
PM-Kisan मोबाईल अॅप वापरून फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी करा.
CSC (Common Service Centre) किंवा जवळच्या SSK सेंटर ला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
बँक खात्याशी आधार लिंक करणे अनिवार्य
फक्त ई-केवायसी पुरेसे नाही तर आधार कार्ड तुमच्या पीएम किसान बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यामुळे फसवणूक,बोगस नोंदणी आणि डुप्लिकेट लाभ रोखले जातात. जर आधार लिंक नसेल, तर तुमचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते.
आधार लिंक करण्याची प्रक्रिया
तुमच्या संबंधित बँकेत जा,जिथे पीएम किसानचे खाते आहे. आधार कार्डाची छायाप्रत आणि इतर आवश्यक कागदपत्रे बँक अधिकाऱ्याला द्या. अधिकाऱ्यांकडून UID (आधार क्रमांक) ची पडताळणी होईल. लिंकिंग पूर्ण झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर SMS येईल.
Mumbai,Maharashtra
May 21, 2025 10:06 AM IST
शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी तातडीने हे काम करून घ्या, अन्यथा PM Kisan चा 20 वा हप्ता मिळणार नाही