Last Updated:
PM kisan yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांची खाती “Voluntary Surrender” या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे बंद झाली होती.
मुंबई : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांची खाती “Voluntary Surrender” या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे बंद झाली होती, आणि त्यामुळे त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणे थांबले होते. मात्र आता केंद्र सरकारने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत, ही चूक सुधारण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
“Voluntary Surrender Revocation” नवा पर्याय
PM Kisan पोर्टलवर आता “Voluntary Surrender Revocation” हा नवा पर्याय सुरू करण्यात आला आहे. या पर्यायाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी चुकून “Voluntary Surrender” निवडले होते, ते आपले खाते पुन्हा सक्रिय करू शकतील आणि पुढील हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.
खाते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया
पोर्टलवर लॉगिन करा
https://pmkisan.gov.in/Pmkisanbenefitsurrender_revocation.aspx या अधिकृत वेबसाईटवर जा. Farmer’s Corner वर क्लिक करा. “Voluntary Surrender Revocation” हा पर्याय निवडा. आधार किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून ‘Get OTP’ वर क्लिक करा.ओटीपी व्हेरिफाय करा. आलेला OTP टाकून ‘Verify OTP’ वर क्लिक करा. शेतकऱ्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. नंतर स्वयंघोषणापत्र स्वीकारा स्क्रीनवर दिलेल्या स्वयंघोषणापत्रावर क्लिक करा आणि “Yes” निवडा.
ई-केवायसी पूर्ण करा
“Proceed for e-KYC” वर क्लिक करून, अटी व शर्ती स्वीकारा आणि Submit करा.
दुसऱ्या ओटीपीची पूर्तता
एक अंतिम OTP आपल्या आधार-लिंक मोबाईलवर येईल. तो OTP व्हेरिफाय केल्यावर खातं पुन्हा सुरू झाल्याचा संदेश स्क्रीनवर आणि मोबाईलवर दिसेल.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
हा निर्णय सरकारने शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन घेतला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अनवधानाने खाते बंद केले होते, त्यांना आता पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 8:38 AM IST
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! हे काम केल्यास PM Kisan चा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होणार