आता वेळ आणि श्रमांची बचत
पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहीर किंवा बोअरवेल सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार जावे लागे. नोंदणीसाठी विविध पुरावे, फॉर्म आणि वेळखाऊ प्रक्रियांचा सामना करावा लागत असे. मात्र, शासनाने आता ही सर्व प्रक्रिया डिजिटल केली असून, “ई-पीक पाहणी DCS 2.0” प्रणालीद्वारे नोंदणी सुलभ झाली आहे.
नोंदणीसाठी कोणते पर्याय?
शेतकऱ्यांना dbt.mahapocra.gov.in या पोर्टलवर किंवा ई-पीक पाहणी अॅपवरून नोंदणी करता येते. ही प्रणाली वापरण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही, आणि कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक नाही. मोबाईलवरून थेट फोटो अपलोड करून नोंदणी करता येते. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो.
नोंदणी कशी करायची?
ई-पीक पाहणी अॅप स्मार्टफोनवर डाउनलोड करा.
लॉगिननंतर शेतकऱ्याचे नाव व खातेक्रमांक निवडा.
शेतजमिनीचा प्रकार (कायम पड / चालू पड) निवडा.
“कूपनलिका पड” (विहीर) किंवा “बोअरवेल” यातील योग्य पर्याय निवडून त्या ठिकाणचा फोटो अपलोड करा.
माहितीची पडताळणी करून स्वयंघोषणा सबमिट करा.
शेतकऱ्यांना होणारे फायदे काय?
1) घरबसल्या नोंदणी केल्याने तलाठ्यांच्या फेऱ्या टाळता येतात. नोंदणीकृत विहिरीमुळे शासनाच्या जलसिंचन योजनांचा लाभ घेता येतो.
2) पाणीपुरवठा किंवा सिंचन योजनेंतर्गत अनुदान मिळवणे शक्य होते.
3) सातबाऱ्यावर थेट नोंद झाल्याने, कर्ज घेणे किंवा सरकारी मदत मिळवणे अधिक सोपे होते.
दरम्यान, सातबाऱ्यावर थेट डिजिटल नोंद झाल्याने या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांच्या नावावर खात्रीशीरपणे राहतो. भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 12:18 PM IST
तुमच्या सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेल अन् झाडांचा उल्लेख का? घरबसल्या 5 मिनिटांत करा नोंद