महाराष्ट्रात येलो व ऑरेंज अलर्ट
राज्यात हवामान खात्याने पुढील आठवड्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः 20, 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यांसह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून आगमनाची शक्यता लवकर
हवामानातील बदल पाहता मान्सून यंदा केरळ व महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातही हवामानात द्रोणीय स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे मान्सूनचे आगमन जलद होण्याची चिन्हे आहेत.
देशभरातील स्थिती
शुक्रवारी देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली.मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओरिसा, सिक्किम, आसाम येथे जोरदार पाऊस. केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, पूर्वोत्तर राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
महाराष्ट्रातील संभाव्य पावसाचे जिल्हे
31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.खास करून खालील 14 जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाचा अंदाज आहे:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली.
अमरावती विभागातही पावसाची झड
गेल्या दोन दिवसांपासून अमरावती विभागातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. येत्या आठवड्यातही अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Mumbai,Maharashtra
May 17, 2025 12:30 PM IST
Weather Update : शेतकऱ्यांना पूर्वमान्सून पावसाने झोडपलं, राज्यातील या ठिकाणांना पुन्हा अलर्ट