‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर निवड
कृषी विभागाने राबवलेल्या योजनांमध्ये ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी नुकतीच कृषी विभागाने जाहीर केली असून, संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती पाठवण्यात आली आहे. याशिवाय ही यादी डीबीटी पोर्टल, कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या लॉगिनवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचे वर्चस्व
या यादीत छत्रपती संभाजीनगर (11,686) आणि अहिल्यानगर (11,182) येथील शेतकरी आघाडीवर आहेत. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील फक्त 495 शेतकऱ्यांची निवड झाली असून, ही संख्या राज्यातील सर्वात कमी आहे.
विविध योजनांतील लाभार्थ्यांची विभागवार आकडेवारी
1) कृषी यांत्रिकीकरण व विकास अभियान (एकूण: 50,925 शेतकरी)
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान : 48,382
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : 2,543
2) सिंचन योजनांमधून लाभ (एकूण: 93,956 शेतकरी)
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (शेततळे): 13,266
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : 1,510
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : 69,969
शेततळ्याचे प्लास्टिक आच्छादन : 9,251
3) फलोत्पादन योजना (एकूण: 7,262 शेतकरी)
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : 7,225
भाजीपाला रोपवाटिका : 37
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्यांनी तातडीने संबंधित कागदपत्रांची पूर्तता करावी. कोणतीही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.
Mumbai,Maharashtra
May 27, 2025 10:33 AM IST