योजनेची सुरुवात अर्ज प्रक्रिया, वेंडर निवड शुल्क भरणे व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याने झाली. नंतर अनेकांना आवश्यक साहित्यही वितरित झाले आणि काही शेतकऱ्यांच्या शेतांवर सोलर पंप इन्स्टॉलही करण्यात आले. मात्र, काही अर्जांमध्ये जुने किंवा चुकीचे मोबाईल नंबर नोंदवले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महावितरणकडून आता मोबाईल नंबर अद्ययावत करण्यासाठी शेतकऱ्यांना संदेश पाठवले जात आहेत.
संदेश काय आहे?
या संदेशात म्हटले आहे, “Application with Duplicate mobile number found, please register your new mobile number for future processing application.” याचा अर्थ असा की, संबंधित अर्जावर जो मोबाईल नंबर नोंदवलेला आहे तो आधीच इतर कोणत्यातरी अर्जासाठी वापरण्यात आलेला आहे किंवा चुकीचा आहे. त्यामुळे अर्जाच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन व अद्ययावत मोबाईल नंबर नोंदवणे गरजेचे आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, पूर्वी मेडा कुसुम तसेच इतर सरकारी योजनांमध्ये हेच मोबाईल नंबर वापरण्यात आले होते. परिणामी, अर्जांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि योजनांच्या लाभापर्यंत शेतकऱ्यांचा योग्य संपर्क राखण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणे आता अनिवार्य झाले आहे.
मोबाईल नंबर कसा कराल अपडेट?
1. सर्वप्रथम “मागेल त्याला सोलर पंप योजना”च्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php भेट द्या.
2. तेथे आपला MKMID (एमकेएमटीआयडी) क्रमांक प्रविष्ट करा.
3. पुढील पृष्ठावर “Change Mobile Number” हा पर्याय निवडा.
4. आधी आपल्या जुना मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
5. त्यानंतर नवीन मोबाईल नंबर भरा.
6. नवीन नंबर नोंदवल्यावर, त्या मोबाईलवर ओटीपी (OTP) येईल.
7. ओटीपी प्रविष्ट करून “Submit” या पर्यायावर क्लिक करा.
8. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोबाईल नंबर यशस्वीरीत्या बदलल्याचा संदेश महावितरणकडून प्राप्त होईल.
दरम्यान, शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर त्वरित अपडेट करून योजनेशी संबंधित सर्व प्रकारच्या पुढील सूचना व अद्ययावत माहिती मिळवावी. अन्यथा त्यांच्या अर्जाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.
Mumbai,Maharashtra
April 28, 2025 8:38 AM IST
सौर कृषी पंप योजना अपडेट! हे काम करणे अनिवार्य, अन्यथा लाखो शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ