Last Updated:
शांताराम पिसाळ हे मागील 10 ते 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन विविध ठिकाणी फिरत आहेत. अत्यंत साध्या जीवनशैलीतही त्यांनी आपल्या व्यवसायातून मोठे यश मिळवले आहे.
बीड: पैठण येथील मूळ रहिवासी असलेले शांताराम पिसाळ हे मागील 10 ते 15 वर्षांपासून बीड जिल्ह्यात आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन विविध ठिकाणी फिरत आहेत. अत्यंत साध्या जीवनशैलीतही त्यांनी आपल्या व्यवसायातून मोठे यश मिळवले आहे. मेंढपाळीच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनी उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधले आणि आर्थिक स्थैर्य मिळवले.
सुरुवातीला शांताराम पिसाळ यांनी फक्त मेंढ्या पाळण्यावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र एकाच स्रोतावर अवलंबून राहून फारशी कमाई होईना. त्यामुळे त्यांनी विविध मार्गांचा अभ्यास सुरू केला. अनेक प्रयोग करूनही त्यांना अपेक्षित यश मिळेना. मात्र त्यांनी हार न मानता मेंढपाळीमध्येच वेगवेगळ्या उत्पादनांची विक्री करण्याचे ठरवले आणि यश त्यांच्या पावलाशी येऊ लागले.
आज त्यांच्या कमाईचे तीन मुख्य स्रोत आहेत. लोकर विक्री, दूध विक्री आणि मेंढ्यांची पिल्ले विक्री. या तिन्ही माध्यमांतून त्यांना दीड ते दोन लाख रुपये प्रति महिना उत्पन्न मिळते. लोकरला चांगली मागणी असते. विशेषतः हिवाळ्यात तर मेंढीचे दूध आणि त्याची प्रक्रिया केलेली उत्पादनेही स्थानिक बाजारात विकली जातात. यामुळे त्यांचे उत्पन्न अधिक शाश्वत झाले आहे.
शांताराम पिसाळ यांनी आपली जीवनशैली आणि व्यवसायाचे स्वरूप दोन्ही काळानुसार बदलले. बाजारात काय मागणी आहे याचा अंदाज घेऊन त्यांनी योग्य त्या ठिकाणी मेंढपाळीचे नियोजन केले. आज ते केवळ एक मेंढपाळ नसून उद्योजकाच्या मार्गावर असलेले प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कामामुळे इतर मेंढपाळांनाही नवे मार्ग सापडू लागले आहेत.
Bid,Maharashtra
June 12, 2025 9:49 PM IST
Success Story: मेंढपाळीच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड, महिन्याला दीड लाख कमाई, Video