Last Updated:
Onion Rate: कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटाच्या गर्तेत अडकला आहे. एकीकडे अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून सोलापूर मार्केटमध्ये कांद्याचे दर देखील पडले आहेत.
सोलापूर – एकीकडे अस्मानी संकट, तर दुसरीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा दुहेरी संकटात आहे. कांद्याचं मोठं मार्केट मानल्या जाणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आवकड वाढली आहे. त्यामुळे गेल्या काही काळात कांद्याचा भाव कमी झाला आहे. सध्याचे कांद्याचे भाव आणि पुढील काळात काय स्थिती राहील? याबाबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी सिद्धराम बावकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
सोलापूर कृषी उत्पादन बाजार समितीत सध्या नोहेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातून कांदा मोठ्या प्रमाणावर येत आहे. उन्हाळी कांद्याचे सोलापूर जिल्ह्यात कमी उत्पादन असते. त्यामुळे अवकाळी पावसाने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान कमीच आहे, असे व्यापारी सांगतात.
सध्याचा दर काय?
सध्या अकाळी पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. तरीही चांगल्या कांद्याला 1500 रुपये पासून ते 1700 रुपये क्विंटल दर मिळत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावासने कांदा खराब होत असून येत्या काळात दर वाढण्याची शक्यता कमी आहे, असेही बावकर सांगतात.
कांद्याचे दर का पडले?
पूर्वी महाराष्ट्र हे एकमेव राज्य कांदा उत्पादनात अग्रेसर होते. परंतु, आता मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेशसह इतर राज्यातील शेतकरी कांद्याची लागवड करत आहे. यामुळे कांद्याच्या उत्पादनात खूप मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. कांद्याला सध्या मागणी कमी आहे, तर कांद्याची आवक सर्वत्र वाढलेली आहे. त्यामुळे कांद्याला मागणी कमी असल्याची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी सिद्धाराम बावकर यांनी दिली.
Solapur,Maharashtra
May 27, 2025 10:35 AM IST
Onion Rate: अवकाळी पावसाने कांदा सडला, सोलापूर मार्केटमध्ये दर पडला, सध्याचे भाव काय?