Last Updated:
Agriculture News : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुराने नुकसान झालेल्या शेतपिकांसाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई राज्य सरकारने कमी केली आहे. तसेच, यापुढे कमाल तीन हेक्टरऐवजी फक्त दोन हेक्टरपर्यंतच मदत दिली जाणार आहे.
मुंबई : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि जुने नुकसान झालेल्या शेतपिकांसाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई राज्य सरकारने कमी केली आहे. तसेच, यापुढे कमाल तीन हेक्टरऐवजी फक्त दोन हेक्टरपर्यंतच मदत दिली जाणार आहे. महसूल विभागाने यासंदर्भातील नवीन शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी जाहीर केला असून, त्यानुसार 1 जानेवारी 2024 रोजी जाहीर झालेला जीआर आता रद्द करण्यात आला आहे.
काय आहे बदल?
1 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या जीआरमध्ये शेतकऱ्यांना वाढीव दराने आणि तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद होती.
परंतु आता 27 मार्च 2023 रोजीच्या दरानुसार नुकसानभरपाई दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) निश्चित निकषांनुसारच मदत देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पूर्वीचा जीआर रद्द ,नवा निर्णय लागू
महसूल विभागाने स्पष्ट केले की, नवीन जीआर तत्काळ लागू झाला आहे. यामुळे १ जानेवारी २०२४ रोजीचा जीआर आता अंमलात राहणार नाही. हा निर्णय 27 मे रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राजकारणात गुंतलेले नुकसानभरपाईचे मुद्दे
1 जानेवारी 2024 रोजी महसूल विभागाने जो जीआर काढला होता, त्यानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी SDRF च्या निकषांबाहेर जाऊन मदत करण्यात येणार होती. ही वाढीव मदत 19 डिसेंबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आली होती. निवडणूक प्रचारातही महायुती सरकारने या वाढीव मदतीचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. मात्र आता केवळ SDRFच्या ठराविक निकषांनुसारच मदत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, वाढीव नुकसानभरपाईची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा जुन्या दरांवरच समाधान मानावे लागणार आहे. पूर्वीपेक्षा दर व मदतीची क्षेत्रमर्यादा दोन्ही कमी झाली असून, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांना दणका! पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात करणार, नवीन बदल काय?