Last Updated:
Agriculture News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत खरीप हंगाम 2025-26 साठी 2.07 लाख कोटींचा किमान आधारभूत किंमत (MSP) निधी मंजूर केला आहे.
मुंबई : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत खरीप हंगाम 2025-26 साठी 2.07 लाख कोटींचा किमान आधारभूत किंमत (MSP) निधी मंजूर केला आहे. हा निर्णय 14 खरीप पिकांवर लागू होणार असून, त्यामध्ये भात, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी, तेलबिया आणि कापसाचा समावेश आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळवण्याची हमी मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय
पावसाळी हंगामात पेरणी होणाऱ्या मुख्य पिकांसाठी केंद्र सरकार दरवर्षी एमएसपी जाहीर करते. यंदाच्या वर्षी केंद्राने केवळ एमएसपी वाढवली नाही, तर एकूण मंजूर केलेली रक्कम 2.07 लाख कोटींवर नेली, जी मागील तुलनेत अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील किंमतींच्या अस्थिरतेपासून संरक्षण मिळेल आणि त्यांचे उत्पन्न निश्चित होईल.
कोणते पीक किती लाभात?
भात हे खरीप हंगामातील सर्वाधिक लागवड होणारे पीक असून, त्याला सर्वाधिक फटका बाजारातील दरातील चढउतारांचा बसतो. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कापूस, डाळी व तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांच्या उत्पादन खर्चावर भरघोस नफा मिळणार आहे.
MSP म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमत (MSP) म्हणजे सरकार शेतकऱ्यांकडून किमान या दराने पीक खरेदी करेलच, याची हमी देणारी किंमत. जर बाजारभाव यापेक्षा कमी असेल, तर सरकार बाजारात उतरत शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करते. यामुळे शेतीवर होणाऱ्या अनिश्चिततेचा धोका कमी होतो.
Mumbai,Maharashtra
मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! MSP मध्ये 50 टक्क्यांनी केली वाढ, वाचा पिकांची यादी…