योजनेचा लाभ कसा घ्यावा?
शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा.
गाळ मागणीसाठी अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करावा.
अनुदानासाठी पात्रता निकष
पात्र शेतकरी गट: सीमांत/अत्यल्पभूधारक: 1 हेक्टरपर्यंत
लहान शेतकरी: 1 ते 2 हेक्टरपर्यंत
विशेष सवलती कोणाला?
विधवा शेतकरी
अपंग शेतकरी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य
वरील गटातील शेतकरी, जरी 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन धारक असले, तरीही अनुदानास पात्र असतील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा (शेतजमिनीचा दाखला)
आधार कार्ड
बँक खात्याचा तपशील
संबंधित प्रमाणपत्र
सीमांत/अल्पभूधारक
लहान शेतकरी
विधवा / अपंग / आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सदस्य असल्याचा पुरावा
लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया
ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन शासकीय निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करतील. ही यादी ग्रामसभेत अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
गाळ वाहतुकीसाठी अनुदान-नवीन आर्थिक मर्यादा
रु. 35.75/प्रती घनमीटर प्रमाणे
प्रति एकर रु. 15,000/- च्या मर्यादेत
अधिकतम रु. 37,500/- (अडीच एकर पर्यंत)
हे अनुदान DBT प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाईल.
गाळाचा वापर आणि मर्यादा
शासनाच्या नियमानुसार गाळ फक्त शेतीसाठी वापरणे बंधनकारक आहे. गाळाची विक्री किंवा इतर ठिकाणी वाहतूक करण्यास मनाई आहे. शेतीतील उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी गाळाचा वापर शिफारस करण्यात आलेला आहे.
Mumbai,Maharashtra