चक्राकार वाऱ्यांचा परिणाम, राज्यभर हवामानात बदल
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे, ज्यामुळे राज्यातील अनेक भागांत हवामानात झपाट्याने बदल होतो आहे. यामुळे पावसाचे वातावरण तयार झाले असून काही ठिकाणी गडगडाटासह सरी देखील कोसळत आहेत.
आज या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता
आज १५ मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे व अहमदनगर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर इतर भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत पावसाची नोंद
राज्यात याआधी रत्नागिरी, रायगड, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर इतर अनेक जिल्ह्यांत उष्णतेची तीव्रता कायम आहे.
महाराष्ट्रात २ जूनला दाखल होण्याची शक्यता
यंदा मान्सून अंदमान बेटांमध्ये ८ ते १० दिवस आधी दाखल झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २५ ते २७ मे दरम्यान केरळमध्ये, तर २ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सूनाची सुरुवात तळकोकणातून होऊन, नंतर राज्यभर विस्तारेल. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, ६ ते १५ जूनदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल.
शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा सल्ला
पूर्वमोसमी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पुढील खबरदारी घेणे आवश्यक आहे: जसे की,
फळबागांतील झाडांची छाटणी करून योग्य आधार द्या, जेणेकरून वाऱ्याने झाडे पडणार नाहीत.
लहान झाडांना दोरी किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्या, त्यामुळे नुकसान टाळता येईल.
पावसाळ्यापूर्वीचे हवामान बदल शेतकऱ्यांसाठी संधी आणि संकट दोन्ही घेऊन येतात. योग्य वेळी तयारी केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल.
Mumbai,Maharashtra
May 15, 2025 10:44 AM IST
पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवलं! या भागांना गारपिटीचा सर्वाधिक धोका