Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून जुनी पीक विमा योजना पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून जुनी पीक विमा योजना पुन्हा लागू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 2 टक्के प्रीमियम भरावा लागणार असून, त्याच्या बदल्यात त्यांना नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे.
पीक विमा योजनेत सुधारणा, गैरप्रकारांना लगाम
गेल्या काही वर्षांत पीक विमा योजनेवर गैरव्यवहार, अपारदर्शकता आणि शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जुनी आणि शेतकरी हिताची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकाटे म्हणाले की, “या योजनेमुळे विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा बसेल आणि शेतकऱ्यांना योग्य वेळी, योग्य रक्कम मिळेल याची खात्री घेतली जाईल.”
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला, पेरणीची घाई करू नका
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झालेल्या 53 व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत, कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना “पेरणीसाठी घाई न करण्याचा” सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “मे महिन्यात झालेल्या अनपेक्षित पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीसाठी सरसावले आहेत. मात्र, आयएमडी (हवामान विभाग) व कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच पेरणी करावी, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.” असंही ते म्हणाले.
धोरण तयार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार मदत
या वर्षी मे महिन्यात विक्रमी पाऊस झाल्यामुळे काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विशेष धोरण तयार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची तयारी सुरू केली आहे. “पीक विमा योजना आणि हवामान बदल लक्षात घेऊन, धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे हित जपले जाईल.” असं कोकाटे यांनी सांगितले आहे.
Mumbai,Maharashtra
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पीक विमा योजना या वर्षीपासून सुरू होणार, प्रीमियम किती भरावा लागणार?