Last Updated:
मार्च ते एप्रिल महिन्यात 1 किलो लिंबाचे दर 180 ते 200 रुपयांवर गेले होते, मात्र आता हेच लिंबू केवळ 30 ते 40 रुपयांमध्ये मिळत आहेत. एक लिंबू 2 ते 3 रुपयांना विक्रीस ठेवले गेले आहे.
पुणे : एकेकाळी पेट्रोलपेक्षाही महाग झालेले लिंबू सध्या ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात 1 किलो लिंबाचे दर 180 ते 200 रुपयांवर गेले होते, मात्र आता हेच लिंबू केवळ 30 ते 40 रुपयांमध्ये मिळत आहेत. एक लिंबू 2 ते 3 रुपयांना विक्रीस ठेवले गेले आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या बाजारात कच्च्या कवळीची लिंबं मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे दरात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी शेतकरी आणि विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
लिंबाच्या गुणवत्तेवरही पावसाचा परिणाम दिसून आला आहे. पावसामुळे लिंबू सडू लागले असून त्यामुळे ग्राहकांची मागणी सुमारे 25 टक्क्यांनी घसरली आहे. याचा फटका निर्यातीला देखील बसत असून परदेशातील खरेदीदारांना हलक्या प्रतीचा माल परवडत नाही.
सध्या पुण्यातील घाऊक बाजारात लिंबाचा प्रमुख पुरवठा सोलापूर, बार्शी, करमाळा आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. व्यापारी हनुमंत काळे यांनी सांगितले की, उत्पादन वाढले असले तरी मागणी कमी असल्यामुळे दर कमी झाले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने अनेकजण तोट्यात जात आहेत. परदेशातील येणारा माल विक्रीला परवडत नाही कारण लोकल मार्केट घसरले आहे.
Pune,Maharashtra
Lemon Price: पावसामुळे लिंबाच्या दराला मोठा फटका, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं, Video