पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत 14 प्रमुख खरीप पिकांच्या नवीन हमीभावांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली.
हमीभाववाढीमध्ये कारळ्याला सर्वाधिक म्हणजेच 820 रुपयांची वाढ देण्यात आली असून तो आता 9,537 रुपये झाला आहे. तर तुरीच्या हमीभावात 450 रुपयांची वाढ होऊन तो 8,000 रुपये झाला आहे. मूगला केवळ 86 रुपयांची, तर उडीदला 400 रुपयांची वाढ मिळाली आहे.
कापसाच्या दोन्ही प्रकारांमध्ये मध्यम व लांब धागा या प्रत्येकी 589 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यम धाग्याचा हमीभाव 7,710 रुपये, तर लांब धाग्याचा 8,110 रुपये झाला आहे.
मक्याच्या हमीभावात 175 रुपयांची वाढ होऊन तो 2,400 रुपयांवर पोहोचला आहे. ज्वारीच्या हायब्रीड प्रकाराला 3,699 रुपये, तर मालदांडी प्रकाराला 3,749 रुपये हमीभाव निश्चित झाला आहे.
केंद्र सरकारने कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा देत हमीभाव निश्चित केले असल्याचा दावा करण्यात आला आहे. खरीप पिकांच्या हमीभावात यंदा 1 टक्क्यांपासून 13.9 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही वाढ 1.4 ते 12.7 टक्क्यांच्या दरम्यान होती.
खरीप हंगाम 2025-26 साठी प्रमुख पिकांचे हमीभाव (रु. प्रति क्विंटल):
पीक 2024-25 2025-26 वाढ (रु)
भात (सामान्य) 2300 2369 69
भात (A ग्रेड) 2320 2389 69
बाजरी 2600 2775 70
रागी 4290 4886 596
मक्याचा 2225 2400 175
ज्वारी (हायब्रीड) 3371 3699 328
ज्वारी (मालदांडी) 3421 3749 328
सोयाबीन 4892 5328 436
मूग 8682 8768 86
उडीद 7400 7800 400
तूर 7550 8000 450
भुईमूग 6783 7263 480
सूर्यफूल 7280 7721 441
तीळ 9267 9846 579
कापूस (मध्यम) 7121 7710 579
कापूस (लांब धागा) 7521 8110 589
कारळे 8717 9537 820
Mumbai,Maharashtra
सोयाबीन ते भुईमुगापर्यंत! 17 पिकांचा हमीभाव किती रुपयांनी वाढला? वाचा एका क्लिकवर