01
आपल्याकडे कांद्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्याच्या कांद्याचं पिक काढणीला आलेला आहे. शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहे. जर कांदा जास्त काळ टिकवून आणि साठवून ठेवायचा असेल, तर काही काळजी घ्यावी लागते. कांदा साठवण्यापूर्वी, कांदा काढण्यापासून ते साठवणीपर्यंत काही प्रक्रिया करावी लागते. त्याचबरोबर साठवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली की, कांदा व्यवस्थितरित्या साठवला जाऊ शकतो. चला तर कांदा साठवता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर जाणून घेऊया…