शेतजमिनीवर घर बांधता येते का?
यांचं उत्तर नाही असं आहे. शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी आधी त्या जमिनीचं ‘नॉन-अॅग्रीकल्चर’ (NA) म्हणजेच बिगर कृषी वापरात रूपांतर करावं लागतं.परवानगीशिवाय कोणत्याही शेतजमिनीवर घर बांधल्यास ती अनधिकृत ठरते आणि स्थानिक प्रशासन ती पाडून टाकू शकते.
शेतजमिनीचं NA (Non-Agricultural) रूपांतर कसं करायचं?
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करा. तहसील कार्यालय तुमच्या जमिनीची खातरजमा करेल. सर्व कागदपत्रं तपासल्यानंतर, तुम्हाला NA वापराची परवानगी दिली जाते. यानंतर महसूल नोंदणी होते आणि घरबांधणीसाठी मार्ग मोकळा होतो.
कोणती कागदपत्रं लागतात?
जमीन मालकाचे ओळखपत्र
भाडेकरू व मालकी हक्काची नोंद
सातबारा उतारा
जमीन वापर योजना व सर्वेक्षण नकाशा
जमीन महसूलाची पावती
कोणतीही थकबाकी किंवा कायदेशीर वाद नसल्याचा दाखला
परवानगी कुणाकडून घ्यायची?
ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेकडून NOC घ्यावी लागते. परवानगीशिवाय कोणतेही बांधकाम केल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
नवीन शासन निर्णय काय सांगतो?
23 मे 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन G.R. जारी केला आहे. यानुसार, आता ‘बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम’ (BPMS) अंतर्गत घर बांधणी व NA प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार शेतजमिनीचा वापर बदलायचा असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य आहे. औद्योगिक प्रकल्प,टाउनशिप प्रकल्प यांसाठी जमिनीचा वापर करायचा असल्यास, तो भूखंड नगरयोजना क्षेत्रात असावा व प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966 नुसार अटी पूर्ण कराव्या लागतात.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 3:33 PM IST
….अन्यथा गावाकडे शेतात बांधलेले घर, बंगला पाडावं लागणार! वाचा त्यामागचे कारण?