अतिक्रमण म्हणजे नेमकं काय?
अतिक्रमण म्हणजे एखाद्या व्यक्तीने परवानगीशिवाय दुसऱ्याच्या मालमत्तेत प्रवेश करून तिथे स्थायिक होणे किंवा ताबा घेणे. हे केवळ अनैतिकच नाही, तर कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आपल्या मालकीची जमीन कोणीतरी वापरत असेल किंवा बांधकाम करत असेल, तर ती अतिक्रमणाची स्पष्ट केस ठरते.
अतिक्रमण थांबवण्यासाठी कायदा काय सांगतो?
भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम 441 मध्ये अतिक्रमणाचा उल्लेख केला आहे. यानुसार, कोणताही व्यक्ती जाणीवपूर्वक आणि परवानगीशिवाय एखाद्या मालमत्तेत शिरला किंवा तिथे थांबला, तर तो दोषी ठरतो. यासाठी कलम 447 नुसार कारवाई करता येते, ज्यात दोषीला दंड किंवा तीन महिने कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
अतिक्रमण झाल्यास काय करावे?
जर तुमच्या जमिनीवर किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झाले असेल, तर खालील उपाययोजना करता येतात.
स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा – प्रथम टप्प्यात अतिक्रमण करणाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करणे गरजेचे असते. यामुळे कायदेशीर नोंद तयार होते.
शासकीय कार्यालयात अर्ज करा – तुमच्या जमिनीची नोंद पट्टी, फेरफार इत्यादीसाठी स्थानिक तलाठी किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
न्यायालयीन पर्याय वापरा – जर वरील उपायांमुळे समस्या सुटली नाही, तर सिव्हिल कोर्टात ‘डिक्लरेशन सूट’ किंवा ‘इंजंक्शन सूट’दाखल करून अतिक्रमण थांबवण्याचे आदेश मागता येतात.
भरपाईसाठी दावा – तुमच्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो.
दरम्यान, काही प्रकरणांत दोन्ही पक्ष चर्चा करून परस्पर सहमतीने अतिक्रमणाचा वाद मिटवतात. त्यामुळे कोर्टात जाण्याआधी योग्य समजूतदारपणाने संवाद साधण्याचा प्रयत्नही काही वेळा फायदेशीर ठरतो.
Mumbai,Maharashtra
June 09, 2025 11:07 AM IST
जमिनीवर वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे वैताग आलाय का? या कायदेशीर मार्गाने शिकवा धडा