Last Updated:
Agriculture News : खरिप हंगाम भारतात जून ते ऑक्टोबर दरम्यान चालतो आणि या काळात भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी महत्त्वाची पिके घेतली जातात. या पिकांची चांगली वाढ आणि उत्पादनासाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी करणे आवश्यक असते. त्यासाठी रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खते वापरणे अत्यंत उपयुक्त ठरते.
मुंबई : खरिप हंगाम भारतात जून ते ऑक्टोबर दरम्यान चालतो आणि या काळात भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन इत्यादी महत्त्वाची पिके घेतली जातात. या पिकांची चांगली वाढ आणि उत्पादनासाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी करणे आवश्यक असते. त्यासाठी रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खते वापरणे अत्यंत उपयुक्त ठरते. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, पाण्याची धारणक्षमता वाढते आणि मातीतील सजीव जीवाणूंना पोषक वातावरण मिळते.
1) शेणखत
शेणखत हे पारंपरिक व नैसर्गिक खत असून त्यात नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा समावेश असतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी प्रत्येक एकराला 8 ते 10 टन शेणखत दिल्यास फायदेशीर ठरते. शेणखत वापरल्यामुळे मातीचे जलधारण सामर्थ्य वाढते आणि मुळांना आवश्यक पोषण मिळते.
2) वर्मी कंपोस्ट
हे जैविक खत गांडूळाच्या साहाय्याने तयार केले जाते. वर्मी कंपोस्टमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित असते आणि हे मुळांच्या विकासास उत्तम पोषक ठरते. यामुळे पीक लवकर फुटते आणि उत्पादन वाढते. एकराला 2 ते 3 टन वर्मी कंपोस्ट देणे फायदेशीर आहे.
3) निंबोळी पेंड
निंबोळी पेंड ही नैसर्गिक कीटकनाशकासारखी कार्य करते. मातीतील कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी ही पेंड उपयुक्त ठरते. यामुळे पिकांचे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 1 एकरासाठी 50-100 किलो निंबोळी पेंड खतासोबत मिसळून द्यावी.
5) बायोफर्टिलायझर्स
रायझोबियम, अझोटोबॅक्टर, पीएसबी (फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया) यांसारखे सूक्ष्मजीव खतं बियाण्यावर प्रक्रिया करताना किंवा जमिनीत मिसळून वापरल्यास अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.
सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास केवळ उत्पादनात वाढ होत नाही, तर जमिनीची उत्पादकता दीर्घकाळ टिकून राहते. पर्यावरणपूरक व टिकाऊ शेतीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या विश्लेषणानुसार सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.
Mumbai,Maharashtra
खरिप हंगामात पिकासाठी जमीन तयार करताना कोणते सेंद्रिय खते द्यावे? वाचा सविस्तर