पावसात जास्त ओलावा, सततचे पाणी, चिखल, गंज निर्माण करणारे वातावरण, विजेचे प्रमाण हे सर्व घटक ट्रॅक्टरसारख्या यांत्रिक यंत्रासाठी धोकादायक ठरतात. यंत्राच्या पातळ भागांमध्ये पाणी शिरल्यास, ते गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. इंजिन, ब्रेक आणि क्लचसारख्या संवेदनशील यंत्रणा अकार्यक्षम होतात. विशेषतः शेतात चिखलात राबणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये टायर आणि ट्रांसमिशन सिस्टीमवर ताण येतो. काही वेळा शेतकरी पावसाच्या पहिल्या सरीनंतरच शेतीत उतरतात. मात्र, ट्रॅक्टरचे योग्य ट्यूनिंग न केले असल्यास, यंत्र रस्त्यात बंद पडते. ही परिस्थिती केवळ आर्थिक नुकसानच करत नाही तर शेतातील शेतीचाही खोळंबा करते.
पावसाळ्यातील ट्रॅक्टर बिघाडाचे सामान्य कारणे
1) इंजिनमध्ये पाणी जाणे
पावसात ट्रॅक्टर थेट पाण्यात किंवा चिखलात राबवले जात असल्याने, अनेकदा एअर फिल्टर किंवा सायलेन्सरमधून पाणी इंजिनमध्ये जाते, त्यामुळे इंजिन सीझ होतो.
2) ब्रेक सिस्टीम फेल होणे
ओलसर हवामान आणि पाण्यामुळे ब्रेक शूज आणि ड्रममध्ये घर्षण क्षमता कमी होते.त्यामुळे ब्रेक नीट लागत नाहीत.
3) क्लच स्लिप होणे
चिखलामुळे ट्रॅक्टरवर ताण येतो.क्लच प्लेट्स नीट कार्य करत नाहीत आणि ट्रॅक्टर हलत नाही.
4)बॅटरी व वायरिंग बिघाड
ओलावा आणि गंजामुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होतो. बॅटरीच्या टर्मिनल्सवर सल्फेशन तयार होते.
5) टायर स्लिपिंग आणि ग्रिपचा अभाव
घासलेले टायर चिखलात पिसून जातात, ज्यामुळे ट्रॅक्टर घसरतो किंवा अडकतो.
नुकसान कसं टाळायचे?
1) ट्रॅक्टरला शेड किंवा कव्हर द्या
पावसाच्या थेट सान्निध्यात ट्रॅक्टर ठेवू नका. शक्य असल्यास शेड किंवा मजबूत प्लास्टिक कव्हर वापरा. यामुळे पाणी वायरिंग आणि इंधन टाकीपर्यंत पोहोचत नाही.
2) नियमित देखभाल वेळेवर करा
ट्रॅक्टर वापरण्याआधी आणि नंतर दररोज 10 मिनिटे खर्च करून त्याची तपासणी करा. ग्रीसिंग, वॉटर लेव्हल, ऑईल, ब्रेक, क्लच यावर लक्ष ठेवा.
3) योग्य ऑईल वापरा
इंजिन, ट्रांसमिशन आणि हायड्रॉलिक सिस्टीमसाठी कंपनीने शिफारस केलेले ऑईल वापरा. ऑईलमध्ये पाणी गेलं असेल,तर ते तत्काळ बदला.
4) वायरिंगवर इन्सुलेशन करा
बॅटरी आणि वायरिंगच्या जोडांवर ग्रीस लावा. उघड्या वायरिंगवर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन टेप वापरून गंज टाळा.
5) चांगल्या ग्रिप असलेले टायर वापरा
खूप घासलेले टायर पावसाळ्यात वापरणे टाळा. शक्य असल्यास ट्यूबलेस टायर निवडा, जे पंक्चरप्रूफ आणि पाण्याला प्रतिरोधक असतात.
6) ब्रेक आणि क्लचचे अॅडजस्टमेंट तपासा
ब्रेक लूज झाल्यास वेळेवर टाईटन करा.क्लच स्लिप होऊ लागल्यास, मेकॅनिकच्या मदतीने रिप्लेस करा.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 10:33 AM IST