Last Updated:
Monsoon 2025 : राज्यात मान्सूनचा जोर वाढत असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात मान्सूनचा जोर वाढत असून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभाग व महासागर माहिती सेवा केंद्राने समुद्रात लहान होड्या न नेण्याचा इशारा दिला असून, नद्यांकाठील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोदावरीसह अनेक नद्यांना पूर, धरणांमध्ये जलसाठ्यात वाढ
राज्यातील गोदावरी नदीसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर असून धरणांमध्येही जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे नद्यांच्या काठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाला तत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर, वाहतूक विस्कळीत
गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 41.7 मिमी पावसाची नोंद झाली असून ठाणे आणि पालघरमध्ये 41.6 मिमी, रायगडमध्ये 40.1 मिमी आणि मुंबई उपनगरात 31.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरीतील खेड व दापोली नगरपालिका हद्दीत पुरामुळे काही प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत.
पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने पुणे घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला असून शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत हलक्याप्रकारच्या सरींचा अंदाज
मुंबई व उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये तुरळक पावसाचा अनुभव येणार असून दैनंदिन व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही.
घाटमाथ्याच्या जिल्ह्यांत 24 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
पुणे, सातारा, नाशिक या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत 23 व 24 जून रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन करत काही भागांमध्ये यलो अलर्ट देखील दिला आहे.
Mumbai,Maharashtra
June 21, 2025 8:47 AM IST
कृषी हवामान : पावसाची सुट्टी नाहीच! पुढील 24 तास धोक्याचे, दाणादाण उडवणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट