Last Updated:
Agriculture News : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी 25 जूनचा विशिष्ट पावसाचा अंदाज जाहीर केला आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील विविध विभागांसाठी २५ जूनचा विशिष्ट पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्यापासून ते मुसळधार पावसापर्यंतचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही भागांत शेतीस पोषक वातावरण निर्माण होणार असले तरी काही ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार, मुंबईत सकाळी भरती
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांत जोरदार सरी पडणार आहेत.
पुणे-कोल्हापूरात मुसळधार शक्यता
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व कोल्हापूरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व नियोजन करताना पावसाच्या अनियमिततेचा विचार करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मराठवाड्यात उष्णतेच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट
विभागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची तीव्र लाट सुरू असल्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे दुपारी बाहेर पडताना काळजी घ्यावी.
विदर्भात विजांसह पावसाचा इशारा
चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर इतर भागांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
नागरिक व शेतकऱ्यांसाठी सूचना
हवामानातील बदल आणि संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसंबंधी निर्णय सावधगिरीने घ्यावेत. तसेच नागरिकांनी विजेपासून सुरक्षितता आणि प्रवासाच्या वेळी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
June 25, 2025 8:56 AM IST
कृषी हवामान : पेरणी करत असाल तर सावधान! मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा