याच कागदावर जमिनीची मालकी, कोणते हक्क लागू आहेत? कोणती बंधने किंवा अटी आहेत? याची स्पष्ट नोंद असते. दुर्दैवाने अनेक वेळा ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या महत्त्वाच्या तपशीलांकडे दुर्लक्ष केले जाते, आणि त्याचा फटका आर्थिक व कायदेशीर अडचणीच्या स्वरूपात बसतो.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनीचे तीन प्रमुख प्रकार आहेत
हि पूर्णपणे खासगी मालकीची जमीन असते. विक्रीसाठी कोणतीही शासकीय परवानगी लागत नाही. सातबाऱ्यावर “खा” असा उल्लेख असतो.
राज्य सरकारकडून वतन, इनाम, पुनर्वसन किंवा भूसंपादनामुळे मिळालेली जमीन.
विक्रीसाठी सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य असते. सातबाऱ्यावर “शर्त लागू” किंवा तत्सम शब्द असतात.
केवळ वापरासाठी दिलेली जमीन असते. विक्री किंवा हस्तांतरणावर कडक अटी असतात.
परवानगीशिवाय व्यवहार बेकायदेशीर ठरतात. प्रसंगी जमीन जप्तही होऊ शकते.
जमिनीवर कोणती अट किंवा निर्बंध आहेत हे सातबाऱ्यावरूनच कळते. जर या नोंदी स्पष्ट नसतील, तर पुढील धोके उद्भवू शकतात.जसे की, व्यवहार शासनाच्या परवानगीविना होऊ शकतो.शासनाचा हिस्सा (Nazrana) भरावा लागू शकतो. जमीन रद्दबातल ठरू शकते
भविष्यात मालकी नाकारली जाऊ शकते. न्यायालयीन वाद उभे राहू शकतात.
सातबाऱ्यावर ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ ची नोंद स्पष्टपणे आहे का हे तपासा
शासकीय अट असल्यास महसूल अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतली आहे का? हे पाहा
विक्रेत्याकडे सर्व अधिकृत परवाने आणि मंजुरी आहेत का? याची खात्री करा
व्यवहाराची सर्व कागदपत्रे अनुभवी कायदेशीर सल्लागाराकडे तपासून घ्या
जर सातबाऱ्यात कोणतीही माहिती संदिग्ध वाटत असेल, तर खालील ठिकाणी संपर्क करा.
तहसील कार्यालय (तालुका स्तरावर)
भूमी अभिलेख विभाग
जिल्हा निबंधक कार्यालय
तसेच तुम्ही mahabhulekh.maharashtra.gov.in अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन सातबारा उतारा तपासू शकता.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 2:43 PM IST
तुमच्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर या शब्दांचा उल्लेख नसल्यास मालकी हक्क जाणार