Last Updated:
Property News : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी वारस नोंदणी करता येते. जर मृत व्यक्तीनं मृत्यूपत्र लिहिलं असेल, तरीसुद्धा कुटुंबातील वारसांना त्यांच्या हक्काचा हिस्सा मिळण्याचा अधिकार असतो.
मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी वारस नोंदणी करता येते. जर मृत व्यक्तीनं मृत्यूपत्र लिहिलं असेल, तरीसुद्धा कुटुंबातील वारसांना त्यांच्या हक्काचा हिस्सा मिळण्याचा अधिकार असतो. तसेच, एकत्र कुटुंबातील एखाद्यानं हक्कसोड पत्र केलं असेल, तरी इतर सदस्यांना आपापला वाटा घेता येतो.
मात्र असे 7 प्रमुख प्रसंग आहेत. ज्यामुळे वारसाला मालमत्तेचा हक्क मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती
एकत्र कुटुंबातील व्यक्तीनं स्वतः कमावलेली मालमत्ता आपल्या हयातीत विकली, बक्षीस दिली किंवा मृत्यूपत्रानं इतर कुणाला हस्तांतरित केली, तर त्याच्या मृत्यूनंतर वारसांना त्या मालमत्तेत कोणताही हक्क राहत नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता कुटुंबातील प्रमुख व्यक्तीनं पुढील कारणांसाठी विकली असेल, तर त्यावर हक्क मागता येत नाही. गंभीर आजाराचा खर्च, कर्जफेड, न्यायालयीन खर्च अशा कायदेशीर गरजांसाठी. पडझड झालेलं घर दुरुस्त करणे, नवीन घर बांधणे, नापीक जमिनीऐवजी उपजाऊ जमीन घेणे अशा मालमत्तेच्या फायद्यासाठी.
जर वारसानेच आई-वडिलांचा खून केला असेल किंवा मदत केली असेल, तर त्याला मालमत्तेत कोणताही वाटा मिळत नाही. अशा प्रकरणात खून करणारा वारस नसल्यासारखा मानला जातो.
हिंदू कुटुंबातील सदस्याने दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, तर त्या व्यक्तीच्या अपत्यांना हिंदू कुटुंबातील मिळकतीत हिस्सा मिळत नाही.
एखाद्या सदस्याने स्वखुशीने आपला वाटा सोडून हक्कसोड पत्र दिल्यास, त्याला किंवा त्याच्या अपत्यांना पुढे कुटुंबाच्या मालमत्तेत हिस्सा मागता येत नाही.
ज्येष्ठ नागरिकाने आपल्या देखभालीच्या आशेवर मालमत्ता बक्षीसपत्र करून दिली आणि नंतर देखभाल झाली नाही, तर त्या ज्येष्ठ नागरिकाला ती मालमत्ता परत स्वतःच्या नावावर घेण्याचा आणि नातेवाईकांना बेदखल करण्याचा अधिकार असतो.
मालमत्तेवर फक्त ताबा असलेल्या व्यक्तीच्या वारसांनी 12 वर्षांच्या आत दावा दाखल केला पाहिजे.विलंब झाल्यास आणि समाधानकारक कारण न दिल्यास न्यायालय दावा फेटाळू शकतं.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 1:35 PM IST
सावधान! या 7 कारणांमुळे कुटुंबातील सदस्याला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही