काय सांगतो ‘शेत रस्ता’ कायदा?
शेतीच्या वारसाहक्कामुळे जमिनीची विभागणी होत गेली की अनेकांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा रस्ता उरत नाही. अशावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या कलम 143 नुसार, शेतकरी तहसीलदाराकडे लेखी अर्ज करून शेतरस्ता मिळवू शकतो. हा अर्ज विशिष्ट स्वरूपात सादर करावा लागतो.
असा करा शेत रस्त्यासाठी अर्ज
तहसीलदाराकडे अर्ज करताना खालील बाबी नमूद करणे आवश्यक आहे. जसे की,
अर्जदाराचे नाव, गाव, तालुका,जिल्हा.
शेतीचा तपशील – गट क्रमांक, क्षेत्रफळ.
शेती सामायिक असल्यास वाटणीतील हिस्सा.
शेजारी असलेल्या शेतकऱ्यांची नावे व पत्ते.
अर्जाचा विषय – “माझ्या शेतीपर्यंत कायमस्वरूपी रस्त्याची मागणी” असा असावा.
अर्जात तुम्ही कोणत्या आधारे रस्ता मागत आहात (उदा. पूर्वीचा वापर, अन्य शेतकऱ्यांची अडवणूक इ.) हे स्पष्ट लिहावे.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी?
शेताचा कच्चा नकाशा – मागणीच्या क्षेत्राचा स्पष्ट आराखडा.
सातबारा उतारा – अर्जदाराच्या व शेजाऱ्यांच्या जमिनीची माहिती.
शेतीवरील वादाचे कागदपत्रे – न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यास त्याची नोंद.
तहसीलदार काय करतो?
अर्ज प्राप्त झाल्यावर शेजाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे विचारले जाते. तहसीलदार स्वतः स्थळ पाहणी करतो आणि खरंच रस्त्याची गरज आहे का हे तपासतो. सर्व पुरावे आणि स्थितीचा विचार करून तहसीलदार निर्णय देतो.
Mumbai,Maharashtra
May 17, 2025 11:39 AM IST
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही? मग या कायदेशीर मार्गाने मिळवा हक्काचा रस्ता