By using this site, you agree to the Privacy Policy and Disclaimer.
Accept
MaxMaharashtraMaxMaharashtraMaxMaharashtra
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Reading: Agriculture News : महसूल विभागाचा मोठा निर्णय! या जमिनींचे वर्ग- 2 मध्ये रूपांतर करणार,नागरिकांना होणार हा फायदा
Share
Sign In
Notification Show More
Font ResizerAa
MaxMaharashtraMaxMaharashtra
Font ResizerAa
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
  • Blog
  • एजुकेशन
  • ऑटोमोबाइल
  • टेक
  • टॉप स्टोरीज़
  • Sucess Story
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Terms and Conditions
    • My Bookmarks
Have an existing account? Sign In
Follow US
  • Advertise
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
MaxMaharashtra > Blog > टॉप स्टोरीज़ > Agriculture News : महसूल विभागाचा मोठा निर्णय! या जमिनींचे वर्ग- 2 मध्ये रूपांतर करणार,नागरिकांना होणार हा फायदा
टॉप स्टोरीज़

Agriculture News : महसूल विभागाचा मोठा निर्णय! या जमिनींचे वर्ग- 2 मध्ये रूपांतर करणार,नागरिकांना होणार हा फायदा

News Desk
Last updated: 2025/05/29 at 4:20 AM
News Desk
Share
3 Min Read

Last Updated:May 29, 2025 9:49 AM IST

Agriculture News : ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरात इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीकडे असलेल्या सुमारे 8894.68 एकर सरकारी जमिनीचे वर्ग दोनमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेस तातडीने गती देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

News18

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरात इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीकडे असलेल्या सुमारे 8894.68 एकर सरकारी जमिनीचे वर्ग दोनमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेस तातडीने गती देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तसेच, या जमिनींवर घर बांधणाऱ्या नागरिकांना कंपनीकडून ‘नाहरकत प्रमाणपत्र (NOC)’ घ्यावे लागू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल मंत्र्यांच्या दालनात यासंदर्भात झालेल्या बैठकीस मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता आणि महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. नागरिकांकडून इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीवर एनओसीच्या नावाखाली अवाजवी रक्कम वसूल केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, ज्यावरही बैठकीत चर्चा झाली.

जमिनीचा इतिहास काय आहे?

या जमिनीचा इतिहास 1945 सालापासूनचा असून, ब्रिटिश सरकारने त्यावेळी रामचंद्र लक्ष्मण यांना 299 वर्षांसाठी जमिनीच्या पिकांतील एक-तृतीयांश उत्पन्न कर म्हणून गोळा करण्याचा हक्क दिला होता. स्वातंत्र्यानंतर मालकी हक्कांमध्ये बदल होत होत, अखेरीस हा अधिकार इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे आला.

आजही ही कंपनी मीरा-भाईंदरमधील अंदाजे 90% जमिनीवर नियंत्रण ठेवून NOCच्या नावाखाली ‘भाडे’ वसूल करते, ज्यामुळे घर बांधणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

नागरिकांना दिलासा

महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही जमीन ‘वर्ग दोन’ म्हणून मान्य करण्याचे निर्देश दिले असून, त्यानंतर बांधकाम किंवा खरेदी-विक्रीसाठी NOC घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे जमीन व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक होतील, अशी अपेक्षा आहे.

आमदार नरेंद्र मेहता यांनीही या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, “हा निर्णय स्थानिक नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. नागरिकांना आता अनावश्यक अडथळ्यांपासून मुक्ती मिळणार आहे.”

स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद

या निर्णयामुळे मीरा-भाईंदर परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. “आम्हाला आता कोणत्याही प्रकारची NOC घ्यावी लागणार नाही, त्यामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होईल,” असे मत अनेक स्थानिकांनी व्यक्त केले.

Location :

Mumbai,Maharashtra

मराठी बातम्या/कृषी/

महसूल विभागाचा मोठा निर्णय! या जमिनींचे वर्ग- 2 मध्ये रूपांतर करणार,नागरिकांना होणार हा फायदा

TAGGED: agriculture news, latest agriculture news, कृषी, कृषी ताज्या बातम्या, कृषी बातमी, शेती ताज्या बातम्या, शेती बातमी
Previous Article ट्रम्प आता अनियंत्रित अनियंत्रित होईल? कोर्टाने आयात करावर बंदी घातली! – अमेरिकन कोर्टाने ट्रम्प्स लिबरेशन डे टेरिफ्सला आपत्कालीन अधिकारांचे अत्याचार केले
Next Article Agriculture News : पावसाळ्यात मालामाल करणारं पीक! किलोला 300 रु भाव, वर्षाला कमवा 10 लाख रुपये
Leave a comment Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

आशियाई पेंट्स तपासणीः ग्रासिमच्या बिर्ला ऑपस पेंट्सच्या तक्रारीवर, सीसीआयने आशियाई पेंट्सची तपासणी सुरू केली – सीसीआयने ग्रासिम बिर्ला ऑप्स पेंट्सच्या तक्रारीवर आशियाई पेंट्सची तपासणी करण्यास सुरवात केली.
Business July 1, 2025
जेएसडब्ल्यू पेंट्सने on 1.4 अब्ज डॉलर्समध्ये एक्झोनजोबेल इंडिया ताब्यात घेतला, पार्थ जिंदल म्हणाले – पेंट मार्केट मजबूत होईल – जेएसडब्ल्यू पेंट्सने अकझोनोबेल इंडियाला 1 4 अब्ज डॉलरच्या डोळ्यांत भारतीय वेदनांमध्ये 3 स्थान मिळविले.
Business July 1, 2025
ताबडतोब तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपये स्विगी देतील – त्वरित डिशेस ग्राहकांना केवळ 99 रुपयांना स्विगी देतील
Business July 1, 2025
‘सामग्री असंवैधानिक सामग्री काढून टाकण्याचा आदेश’, एक्सने कोर्टात सरकारला आव्हान दिले, असे कलम A A ए चा गैरवापर होत आहे – एक्सला आव्हान दिले आहे की भारत सरकारची सामग्री काढून टाकण्याचे आदेश कलम ara ए सेन्सॉरशिप एमएचए पोर्टल असंवैधानिक
Business July 1, 2025

Stay Connected

//

Max Maharashtra (MaxMaharashtra.in) is created by news writers and bloggers. The main objective of Max Maharashtra is to deliver the latest information to the readers in the fastest way.

Quick Link

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions

Top Categories

  • BUSINESS
  • POLITICS
  • TECHHot
  • HEALTH

Sign Up for Our Newsletter


MaxMaharashtraMaxMaharashtra
Follow US
© 2025 MaxMaharashtra News Network. All Rights Reserved.
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Sitemap
  • Terms and Conditions
adbanner
AdBlock Detected
Our site is an advertising supported site. Please whitelist to support our site.
Okay, I'll Whitelist
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?