1) ट्रॅक्टरवर कव्हर टाकणे
पावसात ट्रॅक्टर उघड्यावर ठेवू नका. शक्य असल्यास ट्रॅक्टरसाठी छप्पर असलेली जागा निवडा किंवा प्लास्टिक कव्हर/ताडपत्री वापरा. यामुळे पावसाचे थेंब इंजिन किंवा इलेक्ट्रिक भागांवर पडणार नाहीत.
2) इंजिनची तपासणी करा
पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा ट्रॅक्टरचं इंजिन व्यवस्थित साफ करून सर्व भाग तपासा. तेल गळत असेल तर लगेच दुरुस्ती करावी. इंजिन ऑईल आणि गिअर ऑईल योग्य मात्रेत आणि वेळेवर बदलणे खूप गरजेचे असते.
3) बॅटरीची काळजी घ्या
पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे बॅटरीवर गंज येऊ शकतो. त्यामुळे बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. वेळोवेळी ग्रीस किंवा वेसलीन लावा, जेणेकरून गंज होणार नाही.
4) टायर्सची देखभाल
ट्रॅक्टरचे टायर्स पावसात चिखलात अडकू शकतात. त्यामुळे टायरमध्ये योग्य हवा भरलेली आहे का हे तपासा? टायर्सवर भेगा असतील तर नवीन टायर लावण्याचा विचार करा. स्लिप होऊ नये म्हणून चांगल्या ग्रिपचे टायर्स वापरा.
5) ब्रेक आणि क्लच यंत्रणा तपासा
पावसात ब्रेक फसण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ब्रेकची कार्यक्षमता तपासा. क्लच व्यवस्थित काम करत आहे का हे पाहा. आवश्यक असल्यास त्याचे समायोजन (adjustment) करून घ्या.
6) इलेक्ट्रिक वायरिंग सुरक्षित ठेवा
पावसाळ्यात वायरींगमध्ये शॉर्टसर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्व वायरिंग व्यवस्थित झाकलेले आहे का? कोठेही वायर उघडी तर नाही ना, हे तपासा. शक्य असल्यास इलेक्ट्रिशियनमार्फत वायरिंगची तपासणी करून घ्या.
7) दररोज साफसफाई अनिवार्य
शेतात वापरल्यानंतर ट्रॅक्टर चिखल आणि मातीने माखलेला असतो. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ट्रॅक्टर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे पुसा. हे केल्याने गंज आणि खराबीपासून बचाव होतो.
8) शेड्युल्ड सर्व्हिस विसरू नका
कंपनीने दिलेला ट्रॅक्टर सर्व्हिस शेड्युल लक्षात ठेवा. वेळेवर सर्व्हिस केल्यास छोट्या गोष्टी मोठा खर्च टाळतात.
Mumbai,Maharashtra
June 10, 2025 11:17 AM IST
शेतकऱ्यांनी पावसाळ्यात ट्रॅक्टरचा मेंटेनन्स कसा ठेवावा? जाणून घ्या सविस्तर